Tuesday, April 23, 2024

Latest Posts

ईडीची कारवाई झाल्यावर मी खंबीरपणे न्यायालयात गेलो – हसन मुश्रीफ

छगन भुजबळ यांनी ओबीसी संदर्भातली भूमिका ही मंडल आयोगापासून मांडलेली आहे छगन भुजबळ हे एक ज्येष्ठ नेते आहेत. संजय गायकवाड यांनी त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही. असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. बाबा सिद्धकी आणि त्यांचे चिरंजीव हे आमच्या पक्षात येणार असल्याच्या बातम्या मी आत्ताच ऐकलेल्या आहेत. याबद्दल मला अधिकृत काही माहिती नाही. पण बाबा सिद्धकी आणि त्यांचे चिरंजीव जर आमच्या पक्षात येणार असतील तर त्यांचं स्वागतच आहे, असे यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले.

ईडी कारवाई संदर्भात भाजपवर जरी अनेक जण ताशेरे ओढत असतील तरीही ज्यांच्यावर ईडी कारवाई होत आहे, त्यांनी अधिकाऱ्यांना व्यवस्थित उत्तर दिलीत तर काही घाबरायचं कारण नाही. ईडीला समर्पक उत्तर दिलीत तर घाबरायचं काही कारण नाही. माझ्यावर ही ईडीची कारवाई झालेली आहे मी खंबीरपणे न्यायालयात गेलो आणि मला दिलासा मिळाला असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

हिवाळ्यात पायांच्या तळवे-टाचा होतात कडक,जाणुन घ्या घरच्या घरी डेट स्किन स्वच्छ करायच्या टिप्स

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी पाचव्यांदा ईडीचा समन्स

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss