Tuesday, April 16, 2024

Latest Posts

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवार गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

महाराष्ट्राच्या राजकारणातील आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातील आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज निकाल जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने याबाबत अतिशय मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे. या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचा मोठा पराभव झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह देण्यात आलं आहे. अजित पवार गटासाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. नुकतंच अजित पवार यांनी ट्विटरच्या मार्फत त्यांची पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे. तर अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी सुनील तटकरे यांनी देखील त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी सुनील तटकरे म्हणाले आहेत की, मी फक्त खासदार नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदीय लोकशाही प्रणालीनुसार निवडणुक आयोगाने शिक्कामोर्तब केलं आहे. मला विश्वास आहे की अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली सर्वांनी मिळून एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या जनतेमधून उत्सुर्फ प्रतिसाद मिळत आहे. आज कायद्याने त्याची वैधता मिळाली याचं समाधान असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

नुकतंच अजित पवार यांनी ट्विटर च्या माध्यमातून त्यांची पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे. आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत! श्री. अजित पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. नुकताच हा निकाल लागला आहे. आणि हा निकाल लागल्या लागल्या अवघ्या काही क्षणात अजित पवार यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे. अंडी मुळात अजित पवार यांनी आपल्या नावासमोर राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं देखील पद लिहिले आहे.

हे ही वाचा:

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

लग्नाच्या ११ वर्षानी मोडला हेमा मालिनीच्या लेकीचा संसार,ईशा देओलने घेतला घटस्फोटाचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss