spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

नवाब मलिक यांच्यासंदर्भात फडणवीस यांनी दिलेल्या पत्रासंदर्भात अजित पवारांनी सोडले मौन

भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यासंदर्भात गुरुवारी एक लेटरबॉम्ब टाकला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना एक पत्र लिहिले आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यासंदर्भात गुरुवारी एक लेटरबॉम्ब टाकला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रात नवाब मलिक यांना महायुतीत सहभागी करुन घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. त्यानंतर गुरुवारी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी भूमिका स्पष्ट केली होती. या संदर्भात स्वतः अजित पवार यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवाब मलिक यांच्या संदर्भात अखेर मौन सोडले आहे. नवाब मलिक यांच्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या पत्रावर आपण आपली भूमिका नवाब मलिक यांनी मत व्यक्त केल्यानंतर मांडणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. यावेळी या विषयावर अधिक बोलणे त्यांनी टाळले. सभागृहात कोणी कुठे बसावे, हा माझा अधिकारी नाही. तो विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे, असे अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडवणीस यांना पाठिंबा दिला आहे? त्यावर पुन्हा अजित पवार यांनी त्या पत्राबद्दल मला जे करायचे ते मी करेल, हेच उत्तर दिले. यावेळी माध्यमांनी सारखा तो विषय लावून धरल्यावर अजित पवार चिडले. तुम्हाला अधिकार दिला म्हणजे तुम्ही कसेही वागणार का? असा प्रश्न त्यांनी केला.

 

देवेंद्र फडणवीस यांचे पत्र आपणास मिळाले आहे. आपण हे पत्र वाचले आहे. नवाब मलिक हे पहिल्यांदाच सभागृहात आले. त्यांची भूमिका काय आहे, हे ऐकल्यानंतर मी माझे मत देईल. फडणवीस यांच्या पत्रासंदर्भातील विषय नवाब मलिक यांनी त्यांचे मत व्यक्त केल्यानंतर आपण मांडणार आहोत. मलिक यांच्या भूमिकेनंतर मी माझी आणि पक्षाची भूमिका जाहीर करेल. आधी मलिक यांचे मत काय आहे, ते स्पष्ट कळू द्या, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस गाजण्याची शक्यता

पुणेकरांनी मेट्रोकडे पाठ फिरवली, चार महिन्यात एवढ्या प्रमाणात उत्पादन घटले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss