Saturday, May 18, 2024

Latest Posts

अजित पवार गद्दार… दिल्लीत पोस्टरबाजी, थोरल्या पवारांचे पुढचं पाऊल काय असणार सर्वांचं लक्ष…

आज दिल्लीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीद्वारे शरद पवार मोर्चेबांधणी करणार असून पवारांच्या पुढच्या खेळीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक मोठमोठ्या उलथापालथी या होत आहेत. दिनांक २ जुलै २०२३ रोजी राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड ही घडली आणि त्यामुळे राज्यातील वातावरण हे पुन्हा एकदा अस्थिर झाले आहे. एक वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून काढता पाय घेत बंड केला. आणि आता पुन्हा एक वर्षांनंतर राज्यात मोठा बंड हा झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते म्हणून ओळखले जाणारे अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केला आहे. अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला साथ देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) भूकंप घडवला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांच्यासोबत असलेल्या ८ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडीनंतर आज दिनांक ५ जुलै रोजी शरद पवार आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांनी आपल्या आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची बैठक बोलावली होती. तर आज दिल्लीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीद्वारे शरद पवार मोर्चेबांधणी करणार असून पवारांच्या पुढच्या खेळीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक होत आहे. या बैठकीला राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राज्य कार्यकारिणीतील ४० सदस्य उपस्थित राहणार आहेत. तसेच सर्वच राज्यांचे प्रदेशाध्यक्षही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी ३ वाजता दिल्लीत ही बैठक होत आहे. बैठकीला शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, पीसी चाको, योगानंद शास्त्री, जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला जयंत पाटील गैरहजर राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही गद्दार शब्दाची एन्ट्री झाली आहे. राजधानी दिल्लीतल्या कार्यालयाबाहेर गद्दार पोस्टर लागल्याने चर्चेला उधाण आलं आहे. सारा देश देख रहा है, अपनों में छुपी गद्दारो को माफ नही करेगी जनता. ऐसी फरजी मक्कारोंको, असा मजकूर या पोस्टरवर लिहिण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेली ही पोस्टर्स सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि त्यांचे काका शरद पवार यांनी आमदारांची बैठक बोलावली होती. अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला एकूण ३२ आमदारांनी हजेरी लावली, तर शरद पवारांच्या बैठकीला केवळ १८ आमदार उपस्थित होते. काही आमदारांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे एकूण ५३ आमदार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गदारोळ, अजित पवार गटाच्या बैठकीत शरद पवारांचा फोटोही दिसला.या फोटोवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्षेप घेतला. जे लोक त्यांचा वापर करत आहेत, ते म्हणाले. चित्राला माहित आहे की त्यांच्याकडे दुसरे काहीही नाही. पवार यांनी त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यावर भाजपसोबत जाण्याची टीका केली आणि नमूद केले की त्यांच्या पक्षाशी संबंधित घटनेच्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला भ्रष्ट पक्ष म्हटले होते. राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हावर दावा करण्यासाठी अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली तेव्हा शरद पवार म्हणाले की, पक्षाचे चिन्ह कुणालाही काढून घेऊ देणार नाही.

हे ही वाचा:

Nilesh Rane यांचा Supriya Sule यांच्यावर हल्लाबोल, जास्त हसून बोलणारी लोकं…

कॅनडानंतर आता लंडनमध्ये Khalistan समर्थकांची रॅली, भारताविरुद्ध नवे षड्यंत्र!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss