Saturday, May 18, 2024

Latest Posts

कॅनडानंतर आता लंडनमध्ये Khalistan समर्थकांची रॅली, भारताविरुद्ध नवे षड्यंत्र!

सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासात जाळपोळ आणि गोंधळानंतर आता कॅनडा आणि लंडनमध्ये मोठ्या निदर्शनांची तयारी केली जात आहे. खलिस्तान समर्थकांनी दिनांक ८ जुलै रोजी 'किल इंडिया' नावाची रॅली काढली आहे,

सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासात जाळपोळ आणि गोंधळानंतर आता कॅनडा आणि लंडनमध्ये मोठ्या निदर्शनांची तयारी केली जात आहे. खलिस्तान समर्थकांनी दिनांक ८ जुलै रोजी ‘किल इंडिया’ नावाची रॅली काढली आहे, ज्यामध्ये भारतीय मुत्सद्दी आणि भारताचा निषेध केला जाणार आहे. यासाठी सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. लंडनमधील रॅलीचे पोस्टर ट्विटरवर पाहायला मिळाले आहे. काही निनावी ट्विटर हँडलच्या माध्यमातून हे पोस्टर लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जात होते.

वास्तविक खलिस्तान टायगर फोर्सचा मोठा दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याची काही दिवसांपूर्वी कॅनडातील गुरुद्वाराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आता ही हत्या भारतानेच केल्याचा आरोप खलिस्तान समर्थक करत आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, लंडनमध्ये ऑनलाइन व्हायरल होत असलेल्या पोस्टरमध्ये हेच लिहिले आहे, ज्यामध्ये लोकांना भारतीय दूतावासाबाहेर एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोस्टरवर ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी आणि बर्मिंगहॅममधील भारताचे महावाणिज्यदूत डॉ. शशांक विक्रम यांची छायाचित्रे आहेत. छायाचित्रांमध्ये तो खुनी म्हणून प्रक्षेपित करण्यात आला आहे.

आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे, ज्यामध्ये यूएस स्थित शीख फॉर जस्टिसचे जनरल काउंसिल गुरपतवंत सिंग पन्नू कॅमेरावर दावा करत आहेत की जागतिक शीख समुदाय पंजाबला मुक्त करण्यासाठी शांततापूर्ण आणि लोकशाही प्रक्रिया राखत आहे. निज्जरच्या हत्येला प्रत्येक भारतीय मुत्सद्दी, मग तो ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया किंवा युरोपीय देशांतील असो, जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. कॅनडा तसेच लंडन आणि अमेरिकेत लावण्यात आले होते. येथे ८ जुलै रोजी “खलिस्तान लिबरेशन रॅली” देखील बोलावण्यात आली आहे. जे भारतीय दूतावासाबाहेर निदर्शनात सहभागी होणार आहेत. खलिस्तानी पोस्टरमध्ये, ओटावामधील भारताचे उच्चायुक्त संजय कुमार वर्मा आणि टोरंटोमधील कॉन्सुल जनरल अपूर्व श्रीवास्तव यांचे खलिस्तान टायगर फोर्सचे प्रमुख हरदीप सिंह निज्जरचे “खूनी” असे वर्णन केले आहे. याबाबत भारतात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. अशा पोस्टर्सवर भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे. याबाबत कॅनडाच्या उच्चायुक्तांनाही पाचारण करण्यात आले होते.

हे ही वाचा:

Manipur मधील हिंसाचारात १२० ठार, तर पुन्हा वाढवली इंटरनेट बंदी …

मुख्यमंत्री शिंदे राजीनामा देणार? केली भूमिका स्पष्ट…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss