Sunday, May 19, 2024

Latest Posts

हसन मुश्रीफांवरील कारवाई नंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. अप्पासाहेब नलावडे (Appasaheb Nalavde) साखर कारखाना प्रकरण संदर्भात ईडीने आणि आयकर विभागाने (ED and Income Tax Department) ही सर्व धाड मारली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली असून कोल्हापुरातही (Kolhapura) खळबळ उडाली आहे. जवळपास २० अधिकारी आज पहाटे ६.३० वाजता हसन मुश्रीफ यांच्या घरी पोहचले. या सर्वांनी सकाळपासूनच मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. त्यानंतर अनेक कार्यकर्ते हसन मुश्रीफ यांचे समर्थनासाठी त्यांच्या घराबाहेर उपस्थित असल्याचं दिसून येत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि महाराष्ट्र राज्यकजे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवारांनी यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सध्याच्या सरकारचं आकाशाला भिडणारी महागाई (inflation) आणि बेरोजगारीकडे (Unemployment) लक्ष नसून, सध्याचं सरकार केवळ वेगवेगळ्या व्यक्तींना राजकीय हेतुने त्रास देण्याचं काम करत आहे. या राजकीय हेतुने होणाऱ्या कारवाया थांबवायच्या असतील आणि तुमचा माझा महाराष्ट्र सावरायचा असेल तर, यासाठी शाहु, फुले आणि आंबेडकरांच्या विचारांशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले.

अजित पवार म्हणाले, “केंद्र सरकारच्या ज्या एजन्सी आहेत त्यांना देशातील कुठल्याही व्यक्तींची पूर्ण चौकशीचे अधिकार आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारच्या अधिकारातील चौकशी यंत्रणांना देखील चौकशीचे अधिकार आहेत. पण आत्ता जे घडतंय ते पाहिल्यानंतर त्याला काही राजकीय रंग आहे का? अशी शंका उपस्थित होतं आहे. मधल्या काळात अनिल देशमुखांवर (Anil Deshmukh) आरोप झाले पण त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नव्हते, त्यामुळं कोर्टानं त्यांना सोडलं. तसेच संजय राऊतांबाबतही हेच घडलं त्यामुळं अशा कारवाया महाराष्ट्र आणि भारताला परवडणाऱ्या नाहीत”

हे ही वाचा:

५००० चेंडू, १०५ फूट लांबी… ओडिशाच्या कलाकाराने बनवली जगातील सर्वात मोठी हॉकी स्टिक

मागचं सरकार वर्क फ्रॉम जेल, देवेंद्र फडणवीसांचा आघाडीवर हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss