Sunday, May 12, 2024

Latest Posts

धोक्याची घंटा! सीएम शिंदे १९ नोव्हेंबर नंतर जागते रहो

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतल्या चाळीस आमदारांनी बंड केलं. महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत असलेल्या एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतल्या चाळीस आमदारांनी बंड केलं. महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत असलेल्या एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. पण त्यातही त्यांच्या कामात इतर दोन मंत्र्यांचा हस्तक्षेप होत असायचा. असे असल्याने त्यांना मोकळेपणाने काम करता येत नसल्याचंही शिंदेंच्या नाराजीचं एक कारण आहे. नगरविकासमंत्री असूनही प्रत्येक निर्णयाच्या प्रस्तावावर मंजूरी मिळवताना मिन्नतवऱ्या करायला लागायच्या. कॅबिनेट मंत्री असणाऱ्या शिंदेंची कोंडी करण्यासाठी सनदी अधिकाऱ्यांची एक लॅाबीही दक्ष ठेवण्यात आली होती.

या सगळ्या जाचाला कंटाळून एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह बंड करण्याचा ऐतिहासिक निर्णय यशस्वी केला. राज्यात सत्तांतर झाले फडणवीस व शिंदे यांची युती झाली व राज्याच्या राजकारणात मोठं राजकीय सत्तांतर झालं. जेव्हा पासून हे नवं सरकार स्थापन झालं तेव्हा पासून विरोधकांच्या टीकेचं केंद्रबिंदू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आहेत. हे सरकार किती काळ टिकेल याचे तर्कवितर्क अनेकांनी मांडले, मात्र ‘टाईम महाराष्ट्र’च्या माध्यमांतून जनतेच्या व विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर मिळालं आहे. एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा प्रवास येत्या काळात कसा असणार आहे, यावर ज्येष्ठ राजज्योतिष्य राजकुमार शर्मा यांनी काही दावे केलं आहेत.

सध्या एकनाथ शिंदे यांच्या कुंडलीत राहूने प्रवेश केल्या कारणाने पंडीत शर्मा यांच्या मते एकनाथ शिंदे यांना प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागणार आहे. १९ नोव्हेंबर २०२२ नंतर शिंदे यांच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडतील याची खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाणीव नसेल. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना देखील जपून राहावे राहावं लागणार आहे. पंडीत शर्मा यांच्या मते श्रीकांत शिंदे यांनी त्याच्या वडिलांना न विचारता कोणतेही निर्णय घेऊ नयेत, जाहीर बैठकीतले मतप्रदर्शन करताना काळजी घेत अचूक विचार करून आपले मत मांडायला हवं असा सल्लाही अनेक नेत्यांचे राजगुरू असलेल्या राजकुमार शर्मांनी दिलाय. ते पुढे म्हणाले, कोणत्याही सरकारी कागदपत्रांवर वडिलांच्या सल्ल्याशिवाय सही करू नये. असे पंडीत राजकुमार शर्मा यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पंडीत राजकुमार शर्मा यांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत मोठ विधान केलं आहे. पंडीत शर्मा यांच्या मते भविष्यात साधारण तीन वर्ष तरी शिंदे आणि ठाकरे एकत्र येण्याची शक्याता नाही. यानंतर पंडीत राजकुमार शर्मा यांनी राज्यातील सत्तासंघर्षा संदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १९ नोव्हेंबर २०२२ ते १९ मार्च २०२३ या कालावधीत अधिक सावधान राहायचे आहे. कारण सत्तासंघर्षाचा खटला सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या समोर होणार आहे. मागील काळात सुनावणी पुढे ढकलली असल्या कारणाने निकाल अद्याप हाती आलेला नाही. शिवाय याच काळात शिंदे पिता-पुत्रांचा निकटवर्तीय स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना अडचणीत आणू शकतात. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अधिक सावधानती बाळगत पुढील वाटचाल करताना कोण हितचिंतक कोण हितशत्रू हे समजून घ्यावेच लागणार आहे, असे मोठे भाकीत पंडित राजकुमार शर्मा यांनी केलं आहे.

हे ही वाचा :

शाहरुख आणि त्याच्या टीमकडून कोणताही दंड घेण्यात आलेला नाही; कस्टम अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा

प्रत्येक फुटीरांच्या गटात एक शिंदे कायम असतो हे लक्षात घ्या; संजय राऊत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss