Saturday, July 27, 2024

Latest Posts

मुलाखतीतून Uddhav Thackeray यांची हतबलता दिसली, Sanjay Shirsat यांचा टोला

शिवसेना (Shivsena) नेते आणि आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीवर भाष्य करत संजय शिरसाट यांनी ‘या मुलाखतीतून तुम्ही तुमची हतबलता दाखवून दिली,’ असा टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीबाबत बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “विशेष काही मुलाखतीत नव्हते मात्र जे १-२ वक्तव्य होते. त्यात कुठेही नव्हतं की काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत आम्ही का गेलो? बापाचे विचार मारायचे काम का केले? उबाठा गट फुटला कसा याचे उत्तर मुलाखत घेणाऱ्याला विचारलं असतं तर मुलाखत घेणाऱ्याने ते श्रेय घेतले असते. या मुलाखतीतून तुम्ही तुमची हतबलता दाखवून दिली. जे शिवसैनिकांच पोल होत ते हाताने दगड मारून पांगवलंय. मोदींनी काय करावे, शरद पवार काय करतायत हे विचारचरण्यापेक्षा तुम्ही काय केल ते बघा. स्वतःला अभिमन्यू मानतात म्हणजे तुम्हाला बलिदान द्यायचं आहे का. ज्यांनी तुमच्यासाठी ४० वर्षे काम केले ते काय कौरव होते का, तुमच्या विरोधात गेलं की ते कौरव असतात का?” असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबाबत बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “संजय राऊत यांचे एकही विधान खरे नाही, महायुती प्रचंड मतांनी निवडून येणार आहे. मराठ्यांनी औरंगजेबाचे तंबूचे कळस कापले होते त्याच भूमिकेत महायुती आहे. कार्यकर्तेला कसं जपायच हे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलेलं आहे. मुख्यमंत्री यांची तब्येत ठीक नाही तरी ते फिरतायत असा मुख्यमंत्री होणे नाही,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

“फडणवीस राजकारणातलं कच्च मडकं त्यांना…,;Sanjay Raut यांनी Devendra fadnavis यांना डिवचलं

पुलवामाच्या हल्ल्याला जबाबदार कोण? Uddhav Thackeray यांचा PM Modi यांना सवाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss