Friday, May 17, 2024

Latest Posts

अंबादास दानवे ठाकरे गटाची साथ सोडणार, दानवेंनी दिले स्पष्टीकरण; म्हणाले..

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये छत्रपती संभाजी नगरची जागा चंद्रकांत खैरे यांना मिळाली. छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे हे दोन्ही नेते इच्छुक होते. मात्र जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये दानवेंच नाव नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहे. अंबादास दानवे हे चंद्रकांत खैरे यांची साथ सोडणार असल्याच्या चर्चा सगळीकडे रंगल्या आहेत. अंबादास दानवे यांना लोकसभेचं तिकीट (Lok Sabha Election 2024) न मिळाल्याने नाराज असल्याने महायुतीच्या (Mahayuti) वाटेवर असल्याच्या चर्चा सगळीकडे होत्या.

प्रसार माध्यमांमध्ये या बातम्या प्रसारित झाल्यानंतर अंबादास दानवे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. या सर्व बातम्या खोट्या आहेत. ज्या चॅनेलने ही बातमी चालवली आहे ती खोटी बातमी आहे. मी खोट्या बातम्या दिल्या त्यांच्यावर मानहानी दावा करणार आहे. मी ३० वर्ष जुना शिवसैनिक आहे. ज्यांनी खोट्या बातम्या चालवल्या त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार, लीगल ऍकशन घेतली जाईल. मी शिवसेनेचा आहे. मला गट प्रमुख पदपासून विरोधी पक्ष नेता झालोय, त्यामुळे निवडणूक येतात जातात पण मी जाणार नाही. चॅनेलच्या टीआरपीसाठी काहीही चालवू नका, असे म्हणत अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसभा निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याने मी नाराजी व्यक्त केली होती, मात्र त्याचा फायदा चॅनलने घेतला. मी मागील ३० वर्षंपासून शिवसेनेचे काम करत आहे. त्यामुळे या बातम्या तथ्य नाहीत. आमच्या शिवसेनेनेचा स्वतंत्र विचार आणि बाणा आहे. मी अगोदरच लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार केलाय आणि करणार आहे, असे देखील अंबादास दानवे म्हणाले.

हे ही वाचा:

भाजप नेते गिरीश महाजनांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण, आगामी काळात अनेक नेते…

ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक जागा आम्ही जिंकू- Sanjay Raut

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss