Saturday, April 27, 2024

Latest Posts

ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक जागा आम्ही जिंकू- Sanjay Raut

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कल्याण आणि ठाणे लोकसभेची जागा कोण जिंकणार याबद्दल भाष्य केले. संजय राऊत त्यांना राज विचारे यांच्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, ही जागा शिवसेनेकडेच आहे आणि राजन विचारे शिवसेनेचे उमेदवार आहेत. दुसरा गट भाजपाबरोबर व्यवहार करत असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर या जागा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या आहेत. तो गट फुटलेला आहे आणि भाजपासोबत धुणी भांडी करत आहेत, त्यांना हा प्रश्न विचारा. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या दोन्ही जागा आम्ही जिंकत आहोत. ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक जागा शिवसेना जिंकल्याशिवाय राहणार नाही. ते दिल्लीत वेटिंग वर आहेतच, काहीतरी परिवर्तन होईल तेव्हा वर्षा बंगल्याच्या बाहेर देखील हे वेटिंगवर दिसतील. पालघर आणि कल्याणचे उमेदवार आम्ही उद्या जाहीर करणार आहोत, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

प्रफुल पटेलबाबत प्रश्न विचारला असता, प्रफुल पटेल यांचा भ्रष्टाचाराबद्दल एवढा बोलबाला केला होता, आता त्यांना भाजप क्लीन चीट देत असल्याचे राऊत यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकर आणि आमच्या बैठका झाल्या, चर्चा झाल्या, आमच्यासोबत त्यांनी राहावं असं आम्हाला वाटतं. मी त्याबाबत आता वक्तव्य करणार नाही, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली. ३ तारखेला महाविकास आघाडीची पत्रकार परिषद मुंबईत असणार आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, घटक पक्ष या पत्रकार परिषदेत उपस्थित राहणार आहेत. त्यावर आम्ही निर्णय घेऊ. पण ३१ तारखेला रामलीला मैदानावर जी रॅली आहे त्या महा रॅलीमध्ये महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे आणि शरद पवार उपस्थित राहणार आहेत. संविधान वाचवणे ही देशातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आंबेडकरांसोबत आम्ही वारंवार चर्चा देखील केली आहे. आम्हाला खात्री आहे की, संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या बाजूने ते उभे राहणार नाहीत. ते आंबेडकर आहेत. आमची लढाई संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या विरोधात आहे. वेळोवेळी मीटिंगमध्ये आंबेडकर यांना बोलावलय, हे सर्वांनी नोटीस केलेलं आहे. कालच्या मीटिंगमध्ये ते नव्हते. त्यांना आपण एक प्रस्ताव दिला आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले. 

Latest Posts

Don't Miss