Wednesday, February 28, 2024

Latest Posts

भाजपाच्या नैतिकतेचे ऑडिट होणे गरजेचे आहे, संजय राऊत

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला आहे. आज सकाळी मुंबईतील जुहू बीचवर जात मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वच्छतेच्या कामाचा आढावा घेतला.

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला आहे. आज सकाळी मुंबईतील जुहू बीचवर जात मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वच्छतेच्या कामाचा आढावा घेतला. स्वत: साफसफाईदेखील केली. यावर राऊतांनी निशाणा साधला आहे. सर्व नाटक बंद केली पाहिजेत. तीन घाशीराम कोतवाल सरकार चालवतायेत, असं म्हणत युती सरकारवरही संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय.

यावेळी माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले आहेत की, सर्व नाटक बंद केली पाहिजे. त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची सफाई केली पाहिजे. त्यांनी भ्रष्टाचारी सफाई केली पाहिजे हे तुमचं काम आहे का? मुंबई महापालिका निवडणुका आपण घेत नाही. ठाण्यामध्ये ,पुणे ,नाशिक १४ महानगरपालिका निवडणुका घ्या मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारचे सोग डोंग करण्याची वेळ येणार नाही. मुख्यमंत्री भूमिका ही ठाण्यातील नगरसेवक प्रमाणे आहे

तसेच राऊत पुढे म्हणाले आहेत की, भारतीय जनता पक्ष हा नैतिकतेचे फुगे फुगवत ना छाती फुटेपर्यंत आहे. त्यांच्याकडे नैतिकता तरी शिल्लक आहे का? म्हणून आज आम्ही म्हटलं आहे नैतिकतेचे ऑडिट केले पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा ऑडिट होतं काय खरं, काय खोटं, कुठे काय भारतीय जनता पक्षाच्या नैतिकतेचे ऑडिट होणे गरजेचे आहे. नवाब मलिक प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिण्याचे एक नाटक केलं आहे. प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी काय दोघांचे अपराध सारखे आहेत. प्रफुल्ल पटेल हे अमित शहा आणि मोदी यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. देवेंद्र फडणवीस म्हणतात आणि आम्ही नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही मग तुम्ही कशाला काय लावत आहात. आज सकाळी शिंदे गटाचा पोपट बोलत होता. आम्ही मलिकाच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही, अरे मग तुम्ही सगळे नवाब मलिक यांचे बाप आहेत. गद्दार लोक आहेत. ईडी सीबीआयला घाबरून ज्यांनी पलायन केले त्याचे कारण तुमच्यावर भयंकर आरोप आहेत. तुमच्या मागे ईडी लागली आहे. अटक वॉरंट काढले आहेत

 

तसेच राऊत पुढे म्हणाले आहेत की, तुम्ही आम्हाला काय सांगत आहात नवाब मलिक. ससून ड्रग्स प्रकरणांमध्ये धरपकड चालू आहे पकडापकडीचा लग्नाचा खेळ चालू आहेत ते सुद्धा नाटक बंद करा. दोन मंत्र्यांचा थेट सहभाग आहेत शिंदे गटातील मंत्र्यांचा. ललित पाटीलला वर्षभर ससूनमध्ये ठेवण्यात आलं. त्याचे साम्राज्य होते त्याला प्रोटेक्शन देण्याचं काम या दोघांनी केलं पोलिसांनी त्यांच्यापर्यंत पोहोचावे रवींद्र धगेकर यांनी सांगितले आहे. किरकोळ लहान मासे का पकडत आहेत मंत्रिमंडळात दोघे मासे आहेत त्यांना हात लावून दाखवण्याची हिम्मत दाखवा. एसआयटी स्थापन केले आहे कुठे आहे ती. या महाराष्ट्रामध्ये घाशीराम कोतवालांचा राज्य सुरू आहे. तीन घाशीराम कोतवाल राज्य करत आहे घाशीराम कोतवालांचा कार्यकाळ बघा पेशवे काळातील कशी लुटमार, कशी दरोडेखोरी. घाशीराम कोतवाल यांच्यावर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी होती. पुण्यामध्ये आणि त्यांनी ज्या पद्धतीने लुटमार सुरू करून आपल्या बॉसेसच्या पैसे पोचवायचा सर्वच पोचवायचा अशी ती सर्व कथा आहे घाशीराम कोतवाल महाराष्ट्रात नाटक खूप गाजलं आहे. ती एक विकृती होती, आज महाराष्ट्रात घाशीराम कोतवाल राज्य आहे.

हे ही वाचा:

 बिग बॉस फेम तेजस्वी प्रकाशच्या बोल्ड अंदाजाला नेटकऱ्याची नाराजी,उर्फीची बरोबरी करणार…

मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss