Tuesday, May 21, 2024

Latest Posts

महाराष्ट्राच्या राजकारणात होणार उलथापालथ?, नवीन समीकरण समोर येण्याची चिन्ह

शिंदे गट, भाजप आणि मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलाय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक नवे समीकरण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नवीन घडामोडी घडताना पाहायला मिळतात. एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत जाऊन सत्ता स्थापन केल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत एकत्र आगामी महापालिका निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. मात्र महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा यासाठी विरोध असून काँग्रेसचा देखील छुपा विरोध आहे. मात्र त्या नंतर आता शिंदे गट, भाजप आणि मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलाय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक नवे समीकरण होण्याची चिन्हे दिसत आहेत. हे समीकरण ठाकरे गटासाठी मात्र मोठं आव्हान असणार असल्याचं बोललं जातंय. कारण येत्या सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या तिन्ही पक्षातील तरुण नेत्यांची पडद्यामागून सूत्र हलवण्याची तयारी सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या समोर असलेल्या या आव्हानाला ते कसे सामोरे जातात याकडे लक्ष लागून आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाच्या युवा सेनेची कोअर कमिटीची बैठक बोलवण्यात आली असून खासदार श्रीकांत शिंदे या बैठकीचं मार्गदर्शन करतील. या बैठकीमध्ये शिंदे गटाची कार्यकारणी मजबूत करण्यासंदर्भात श्रीकांत मार्गदर्शन करतील. त्याचबरोबर सिनेट निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली असून महापालिका निवडणूक, तसेच अयोध्या दौऱ्या संदर्भात देखील चर्चा होणार आहे.

लवकरच सिनेट निवडणुका जाहीर होतील. यासाठी सर्व पक्षांनी कंबर खोचलेली पाहायला मिळते. सध्या सिनेटमध्ये ठाकरे गटाच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचे वर्चस्व आहे. यातील १० सदस्य आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेचे होते मात्र त्यातील २ सदस्य शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. कारण या निवडणुकीसाठी शिंदे गट, भाजप, मनसे एकत्र येणार आहेत. शिंदे गटातून पूर्वेश सरनाईक, मनसे मधून मनसे नेते नितीन सरदेसाई यांचे पुत्र यश सरदेसाई तर भाजपकडून निरंजन डावखरे यांच्यावर मोर्चेबांधणीची जबादारी देण्यात आली आहे.

आता आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात काय उलथापालथ होते? आदित्य ठाकरे त्यांच्या समोर असणाऱ्या आव्हानाला कसे सामोरे जातात? हे पाहणे महत्वाचे राहणार आहे.

हे ही वाचा:

एअर इंडियाच्या विमानात पुन्हा घडली तीच किळसवाणी घटना, पुन्हा पुरुषाकडून महिलेच्या ब्लॅंकेटवर…

Ali Baba Dastaan-E-Kabul मध्ये तुनिषाच्या जागी आता अवनीत कौर साकारणार राजकुमारी मरियमची भूमिका?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss