Wednesday, February 28, 2024

Latest Posts

अंबादास दानवे यांचा प्रवेश झाल्याचे जाहीर करून टाका; प्रविण दरेकरांचा खोचक टोला

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्याने अधिवेशनाचा पहिलाच दिवस चांगलाच गाजला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी पक्ष एकमेकांवर तुटून पडले. नवाब मलिक हे सत्ताधारी बाकावर बसल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून याबाबत योग्य निर्णय घ्या असे सांगण्याची वेळ आली.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा नवाब मलिक यांच्या यांच्यावरून तसेच मराठा आरक्षणावरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी एक वेगळाच प्रसंग घडला आहे. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त एकनाथ शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला. आजच आमच्याकडे अंबादास दानवे यांचा प्रवेश झाल्याचे जाहीर करून टाका, अशी मिश्किली केली.त्यानंतर त्यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनासुद्धा टोला लगावला आहे. ते म्हणाले, सगळ्यांना सोबत घ्या आणि आम्हाला बाहेर करा. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तेवावरून खोचक टोला लागवल्याची चर्चा रंगली आहे. या सगळ्या घडामोडींवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्कार केला. हे सभागृह नोंद घेईल की आज विधानपरिषद शतक महोत्सव वर्ष आहे आणि यामधे सभापती नाही. यापूर्वी ८० टक्के समाज संबंधित प्रश्न उपस्थित होत होते आणि २० टक्के राजकीय प्रश्न होते. आता, मात्र परिस्थिती वेगळी आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मराठाआरक्षणाचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षण हा मुद्दा अत्यंत संवेदनशील झाला आहे. या संदर्भात अनेक कारवाई देखील करण्यात आल्या. त्यामुळे आज मराठा आरक्षणा संदर्भात भूमिका जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह याचिका दाखल करून सुनावणी पूर्ण केली आहे. मात्र त्यावर अजूनही निर्णय देण्यात आला नाही.

हे ही वाचा:

नवाब मलिक यांच्यासंदर्भात फडणवीस यांनी दिलेल्या पत्रासंदर्भात अजित पवारांनी सोडले मौन

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस गाजण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss