Saturday, July 27, 2024

Latest Posts

अशोक चव्हाण आदर्श घोटाळा लपवण्यासाठी भाजपमध्ये गेले; उद्धव ठाकरेंनी केली चव्हाणांवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यांनी आपल्या विभागीय सदस्य पदाचा राजीमाना दिला आहे. अशोक चव्हाण आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यावर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष निवडणूक आयोगाने चोरांच्या हाती दिला आहे. आता काँग्रेस देखील अशोक चव्हाण यांच्या हातामध्ये देणार की काय? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. अशोक चव्हाण आदर्श घोटाळा लावण्यासाठी भाजपमध्ये गेले की काय असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी चव्हाणांवर टीका केली आहे.

भाजप भाडोत्री लोकं घेत असून सतरंज्या उचलणाऱ्याच्या बोकांडी बसवत आहेत. आत्मविश्वास नसल्याने भाजप फोडाफाडी करत आहेत. आणखीन काही वर्षानंतर भाजपचां अध्यक्ष सुद्धा काँग्रेसमधून आलेला असेल. एकाने शिवसेना भाजपच्या ताब्यात दिली. मी आव्हान केले असून, पोलिसांना बाजूला ठेवा लोकांना गोळा करू आणि विचारू शिवसेना कुणाची आहे. मला अशोक चव्हाण यांचे आश्चर्य वाटत आहे. आजपर्यंत सगळ्या जागा वाटपात वाटून घेण्यासाठी प्रयत्न करत होते आणि आता गेले, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही भ्रष्टचार करा आणि आम्ही तुम्हाला आमदार खासदार करणार. तुमच्या योजना भारत सरकारच्या आहेत की मोदी सरकारच्या? सगळे भाडोत्री आणले जात आहे. मी मुख्यमंत्री म्हणून शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करून कर्जमुक्ती जाहीर करू शकलो असतो. पण मी तसे केले नाही. ८० कोटी लोकांना फुकट धान्य देत असाल, तर मग गरिबी कुणाची हटवली. देशातील सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा निर्णय घ्यावा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर नाना पटोले म्हणाले, काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्देवी आहे. कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचा विचार आणि लोकशाही वाचविण्यासाठी धर्मांध, हुकुमशाही वृत्तीच्या भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढून त्यांना पराभूत करू, असे नाना पटोले म्हणाले.

हे ही वाचा: 

Ashok chavan यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर Devendra Fadnavis म्हणाले, आगे आगे देखिए, होता है क्या…

Ashok Chavan भाजपच्या वाटेवर? नॉट रिचेबल असल्याने…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss