Saturday, July 27, 2024

Latest Posts

Ashok chavan यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर Devendra Fadnavis म्हणाले, आगे आगे देखिए, होता है क्या…

अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केले आहे. काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत, असं सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Ashok chavan resignation news : सध्या सगळीकडे आगामी लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election 2024) वारे हे वाहत आहे. याच पार्श्वभूमीवर आता सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. सर्व पक्ष ऍक्शन मोड मध्ये आल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच महाविकास आघाडीनंही (Maha Vikas Aghadi) महायुतीविरोधात एकत्र येत आगामी लोकसभेसाठी तयारी करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीला अवघे काहीच महिने राहिलेले असताना काँग्रेसच्या गटातून मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजतेय. लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात काँग्रेस पक्षाला खिंडार पडताना दिसत आहे. तर अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केले आहे. काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत, असं सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

अशोक चव्हाण यांच्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मी मीडियाकडून अशोक चव्हाण यांच्याबद्दल ऐकले. पण सध्या मी एवढेच सांगू शकतो की काँग्रेसचे अनेक चांगले नेते भाजपच्या संपर्कात आहेत. जनतेशी जोडलेल्या नेत्यांची काँग्रेसमध्ये घुसमट झाल्याचे जाणवत आहे. मला खात्री आहे की काही मोठे चेहरे काँग्रेसमध्ये सामील होतील. भविष्यात काय होते ते बघूया…’

भाजपसोबत अनेक पक्षातील बडे नेते येण्यासाठी इच्छुक आहेत. विशेषत: काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. काँग्रेसमधील गटबाजी आणि अंतर्गत राजकारणाला नेते कंटाळले आहेत. काँग्रेसमधील मुस्कटदाबी आणि मोदींच्या नेतृत्त्वातील भारताची प्रगती पाहता, अनेक नेत्यांना वाटतं की मुख्य प्रवाहात यायला हवं. त्यामुळे आमच्या कोण कोण संपर्कात आहेत, भाजपमध्ये कोण कोण येणार याबाबत मी इतकंच सांगेन, आगे आगे देखीए, होता है क्या! “आम्ही असं फोडाफोडीच टार्गेट घेऊन चालत नाही. सगळ्याच पक्षातील लोक आमच्या संपर्कात आहेत. अनेकांना वाटतय की, आपण भाजपासोबत जावं, काहीजण निर्णय घेत आहेत. मोठ्या प्रमाणात भाजपासोबत मोदीजींसोबत जाव अशी भावना सर्वपक्षीय नेत्यांमध्ये पहायला मिळतेय” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा: 

पॅराग्लायडिंगच्या पंढरीत रंगणार साहसी क्रीडाप्रकाराचा मेळा

छोट्या पडद्यावरील‘आई कुठे काय करते’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप ? चर्चा सुरु

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss