Monday, May 20, 2024

Latest Posts

Indira Gandhi Birth Anniversary: इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भारत जोडो विशेष महिला पदयात्रा उत्साहात

महिलांची विशेष पदयात्रा काढून शनिवारी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती भारत जोडो यात्रेने मोठया उत्साहात साजरी केली. राहुल गांधी सोबत शेगाव येथून महिला मोठ्याप्रमाणात सहभागी झाल्या. काही महिलांनी भरजरी फेटे बांधले होते. तर काहींनी आकर्षक वेशभूषा केल्या होत्या. यात्रा मार्गावर ग्रामीण भागात महिलावर्ग हजारोंच्या संख्येने स्वागतासाठी उभा होता. नागपूर येथील प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकारी नफिसा सिराज अहमद यांनी अस्सल मराठमोळी “नऊवारी” पोशाख केला होता. त्यांची वेशभूषा लक्षवेधी ठरली होती.

हेही वाचा : 

Aamir Khan : ईराच्या एंगेजमेंटमध्ये आमिर खानने केला जबरदस्त डान्स, पहा व्हिडीओ…

याबाबत त्या म्हणाल्या,”हिंदू – मुस्लिम वेगवेगळे नाहीत. आम्ही सर्व एकच आहोत, मराठी आहोत. या पोशाखातून मला महाराष्ट्राची संस्कृती दाखवून द्यायची होती. इतरांच्यापेक्षा वेगळा पोशाख असल्याने मला राहुल गांधी यांनी बोलावून घेतले. त्यांची भेट झाली. समाधान वाटले. आता भारत जोडो यात्रेचा उद्धेश सुद्धा असाच पूर्ण होईल, याची खात्री वाटते,” असे त्यांनी सांगितले. त्यांच्यासोबत वर्षा गुजर, आशा राऊळ, उषा कुकटे आणि अन्य सहकारी उपस्थित होत्या. श्रिया विनोद रगडे या जलंब येथील तेरा वर्षाच्या मुलीला राहुल गांधी यांना भेटल्यापासून ती आनंदाच्या भरात उड्या मारत होती. काय सांगू आणि काय नको झाले होते. आपल्या दारात राहुल गांधी यांची यात्रा येताच आईसोबत तिने त्यांचे औक्षण केले. मग राहुल गांधी यांनी आपुलकीने विचारपूस केली आणि ती आनंदून गेली.

Bhagatsingh Koshyari: राज्यपालांच्या वक्तव्यावर संभाजी छत्रपती संतापले म्हणाले, राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर काढा…

“काय सांगू, मी कधीच पाहिले नव्हते. आज आम्ही त्यांना भेटलो आणि मला खूप आनंद झाला आहे,” असे तिने सांगितले. प्रियाची आई दीपाली सुद्धा राहुल गांधी यांना भेटून खूप आनंदी होत्या. “शिक्षण घेऊनसुद्धा आमचा काहीच उपयोग नाही. नोकरी नाही, शेतमजुरी करून दिवस काढत आहोत. मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत,” अशी व्यथा मांडली. त्यांच्या आजूबाजूच्या महिलांचीही तशीच स्थिती आहे. बेरोजगारी आहे, महागाई प्रचंड आहे. खायचे काय आणि मुलांना शिक्षण कसे द्यायचे हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न आहे? राहुल यांनी या सर्वांच्या व्यथा आस्थेवाईकपणे जाणून घेतल्या.

Kedar Dighe Exclusive : पोलीस यंत्रणांवर दबाव आणून, राजकरण केलं जात आहे… ; केदार दिघे

Latest Posts

Don't Miss