Friday, May 17, 2024

Latest Posts

मोठी बातमी!, राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार?

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. अश्यातच चर्चा आहे ती म्हणजे लोकसभा आणि राज्य सभा या निवडणुकांची. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष हे ऍक्शन मोडमध्ये आले आहेत.

Rajya Sabha Election : सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. अश्यातच चर्चा आहे ती म्हणजे लोकसभा आणि राज्य सभा या निवडणुकांची. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष हे ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. तर काहींनी पक्षाची साथ सोडत नवीन पक्षात एन्ट्री देखील केली आहे. परंतु आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा (Rajya Sabha Election) जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. राज्याच्या राजकारणातील ही मोठी घडामोड आहे.

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत एका जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण आता सूत्रांकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यसभेची ही निवडणूक आता बिनविरोध होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या निवडणुकीसाठी येत्या २८ फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावर सकारात्मक चर्चा झाली आहे. महायुतीकडे ५ जागा तर महाविकास आघाडीकडे (MVA) १ जागा गेल्याचं समजतेय. येत्या २७ फेब्रुवारी रोजी राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे. त्यानुसार, भाजप ३, शिवसेना शिंदे गट १, राष्ट्रवादी अजित पवार गट १ आणि काँग्रेस १ असे उमेदवार राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावर एकमत झाल्याची राजकीय चर्चा सुरु आहे. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar)यांचा गट निवडणुकीत उमेदवार न देण्याची शक्यता आहे.

राज्यसभेतील महाराष्ट्राच्या ६ खासदारांचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपत आहे. त्यामुळे या जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. कार्यकाळ संपणाऱ्या खासदारांमध्ये भाजपचे तीन, ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसच्या एका खासदाराचा समावेश आहे. सध्याचं पक्षीय बलाबल पाहता भाजपचे तीन आमदार सहज निवडून येण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस, शिंदे गट आणि अजित पवार गट प्रत्येकी एक आमदार निवडून आणू शकतात. ठाकरे गटाने ताकद लावली तर कदाचित त्यांचा उमेदवार निवडून येऊ शकतो. पण ते खूप कठीण असणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय बलाबल

भाजप : १०४
राष्ट्रवादी (अजित पवार गट) : ४२
शिवसेना (एकनाथ शिंदे गट): ४०
काँग्रेस : ४५
शिवसेना उद्धव ठाकरे गट : १६
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : ११
बहुजन विकास आघाडी : ३
समाजवादी पक्ष, एआयएम आणि प्रहार जनशक्ती प्रत्येकी २
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सीपीआयएम, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, रासप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पक्ष प्रत्येकी १
अपक्ष १३

हे ही वाचा:

हिवाळ्यात पायांच्या तळवे-टाचा होतात कडक,जाणुन घ्या घरच्या घरी डेट स्किन स्वच्छ करायच्या टिप्स

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी पाचव्यांदा ईडीचा समन्स

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss