केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तुतारीचे रणशिंग फुंकणाऱ्या माणसाचे चित्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला बहाल केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला तुतारीचे चिन्ह प्राप्त झाले आहे. आता याच चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची निवडणूक लढवली जाणार आहे. याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असे नाव दिले होते. त्यांनतर आता चिन्हावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
याबाबत आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट केले आहे. या माध्यमातून त्यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. ओ मोठ्ठ्या ताई….तुतारीतुनी थकाल वाजवुनी भाजपद्वेषाची जुनी पिपाणी… करा कितीही खोटे पेरणी परि जनतेच्या ना पडेल पचनी.. उंटावरली उगा अनेक शहाणी पोकळ बडविती नगारखानी.. लवकरच तुम्हा पाजू पाणी सज्ज आम्ही आहो युद्धरणीं… असे ट्वीट करत चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावर निशाणा साधला आहे.
डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी वाजवा तुतारी,गाडा गद्दारी..! असे म्हणत ‘हाता’तील ‘मशाल’ प्रज्वलित करून विजयाची ‘तुतारी’ वाजवणारच! असा विश्वास व्यक्त केला आहे. निवडणूक आयोगाकडे आम्ही ज्या तीन निशाणी सुचविल्या होत्या. त्यातील चिन्ह न देता आम्हाला त्यांनी “तुतारी” हे चिन्ह दिले. लढण्यासाठी शुभेच्छाच दिल्या आहेत. हा आमच्यासाठी ‘शुभसंकेत’ आहे. याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार मानतो. कारण, त्यांनी सांकेतिक भाषेत ‘तुम्ही युद्धाला उभे रहा आणि जिंका’ असाच संदेश शरद पवार नावाच्या योद्ध्याला आणि त्यांच्या सैनिकांना “तुतारी” हे चिन्ह देऊन दिला आहे. असे ट्विट करत डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी तुतारीचे चिन्ह मिळाल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
काय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार यांचे ट्विट?
“एक तुतारी द्या मज आणुनि फुंकिन मी जी स्वप्राणाने भेदुनि टाकिन सगळी गगने दीर्घ जिच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मजलागुनी!” “महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!”
हे ही वाचा:
‘जय महाराष्ट्र’ ऐकू आलं आणि उर भरून आला,’Best Maa’ पुरस्कार मिळताच हेमांगीची भावूक पोस्ट
ज्येष्ठ अभिनेते Ashok Saraf यांना CM Eknath Shine यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार
Follow Us