spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

‘स्वतः च्या पुतण्याचे डोके फोडले आणि रडत राहिले,’ BJP नेत्याचे Nana Patole यांच्यावर गंभीर आरोप

साकोली येथे झालेल्या सभेत भाजपचे विधान परिषद आमदार परिणय फुके यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात प्रचाराचे बिगुल वाजले आहे. विविध पक्षातील नेतेमंडळी विरोधी पक्षातील नेत्यांवर आरोप-प्रत्यारोप, टीका टिपण्या करत आहेत. अश्यातच, भाजपचे (BJP) विधान परिषद आमदार परिणय फुके (Parinay Fuke) यांनी महाराष्ट्र काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. साकोली (Sakoli) येथे झालेल्या सभेत बोलताना परिणय फुके म्हणाले, “मागच्या निवडणुकीत नाना पाटोले यांनी आपल्या पुतण्याचे डोके फोडले होते. त्यानंतर, रडत राहिले. आता, साडेचार वर्षांपासून साकोली विधानसभा क्षेत्रातील जनता रडत आहे.” परिणय फुके यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आले आहे.

साकोली येथे झालेल्या महायुतीच्या (Mahayuti) सभेत परिणय फुके म्हणाले, “मागच्या वेळेस (२०१९ विधानसभा निवडणूक) नाना पटोले यांनी स्वतः च्या पुतण्याचे डोके फोडले आणि रडत राहिले. आपले अश्रू गाळून मते मागितली. आपल्या भागातील जनता त्यांच्या मगरीच्या अश्रूंमध्ये वाहून गेली आणि त्यांना निवडून दिलं. आता साडेचार वर्षांपासून साकोली विधानसभा मतदारसंघातील जनता रडत आहे. एकही विकासकाम झाले नाही, एकही रोजगार निर्मिती झाली नाही.” ते पुढे म्हणाले, “२०१४ मध्ये प्रफुल्ल पटेल यांनी जो भेलचा प्रकल्प आणला त्याला रद्द करण्याचं काम नाना पटोले यांनी केलं. इथेनॉल बनवण्याचा कारखाना बनवण्यात आला. विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर नाना पटोले यांनी तो इथेनॉल कारखाना बंद करण्याचं पाप केलं. आपण निवडणूक हरणार हे लक्षात आल्यावर ते निआवडणुकीच्या शेवटच्या दिवसांमध्ये काहीतरी गडबड करतात. काहींना काही षडयंत्र रचतात.”

काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांच्या गाडीला झालेल्या अपघाताबद्दल बोलताना परिणय फुके यांनी गम्भीर आरोप केले आहेत. ते पुढे म्हणाले, “काही दिवसांपूर्वी यांची गाडी मागून थोडीशी खरचटली. आणि यांच्या डोक्यातली ट्यूबलाईट जळाली. आपण निवडणूक हरणार म्हणून लोकांची सहानुभूती घेतली पाहिजे. म्हणून, हे भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.”

हे ही वाचा:

Narendra Modi यांच्या सर्व गॅरंटी खोट्या, खोटं बोल पण रेटून बोल हीच BJP ची पद्धत – Mallikarjun Kharge

Shrikant Shinde Foundation मध्ये ५०० कोटींचा गैरव्यवहार, Sanjay Raut यांचे PM Modi यांना पत्र

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss