Friday, May 17, 2024

Latest Posts

नाशिकमधून छगन भुजबळांना उमेदवारी मिळण्याची शक्यता; उमेदवारीसाठी माझी मागणी आणि आग्रह..

निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरही महायुतीमधील जागा वाटपाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.

निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरही महायुतीमधील जागा वाटपाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. जागा वाटपावरून अजूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. एका बाजूला शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्याकडून नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या (Nashik Lok Sabha Constituency) तिकिटासाठी रस्सी खेच सुरु आहे. तर दुसरीकडे या जागेवर भाजपने दावा केला आहे. त्यातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नाव घेता उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

छगन भुजबळ म्हणाले, उमेदवारीसाठी माझी मागणी आणि आग्रह नव्हता. दिल्लीतील बैठकीमध्ये अचानक माझ्या नावाच्या चर्चा सुरु झाल्या. मला बोलविण्यात आले. मी होळीच्या दिवशी मुंबईहून नाशिकला यायला निघालो. मला पुन्हा मुंबईला बोलावण्यात आले. फडणवीस यांना विचारले माझ्या उमेदवारीची चर्चा आहे ते खरे आहे का? फडणवीसांनी मला सांगितले हो खरे आहे. त्यामुळे तुम्हालाच उभे राहावे लागेल, असे छगन भुजबळ म्हणाले. ज्याला निवडणुकीसाठी उभे राहायचे आहे तो चार पाच महिन्यांपासून चर्चा करत आहे. मात्र माझे नाव अचानक पुढे आल्यानंतर आमची काही लोकांसोबत चर्चा सुरु झाली होती. त्यावेळी ही गोष्ट मिडियापर्यंत पोहोचली. त्यामुळे नाशिक पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या उमेदवारीचा फार आग्रह आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेबाबत मोठी चर्चा सुरु आहे. जो निर्णय वरिष्ठ देतील, तो मला मान्य आहे. महायुतीसाठी आम्ही सर्व एकजुटीने काम करणार आहोत. महायुतीकडून राष्ट्रवादीला नाशिकची जागा सुटली तर राष्ट्रवादीचे घड्याळ हीच निशाणी असणार आहे, असे देखील छगन भुजबळ म्हणाले.

मराठा समाजाने काही दिवसांआधी छगन भुजबळ यांच्या विरोधात होर्डिंग लावले होते. यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, माझ्या नावाचे होर्डिंग लावण्यात आले होते. मी पुन्हा एकदा सांगतो मराठ्यांना कधीच विरोध केला नाही. मी नेहमीच आरक्षणाला स्पोर्ट केला आहे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, ओबीसी मधून नको, अशी मागणी होती. ती मान्य झाली आहे. ही माझी चूक असेल तर मी ती चूक केली आहे. असे होर्डिंग का लावतात? मला माहित नाही. निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीने होऊ द्या, असे त्यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडे यांना अडवले यावर त्या काहीच बोलल्या नाहीत, प्रणिती शिंदे या कधी मराठा समाजाविषयी बोलल्या का? त्यांना का विरोध केला. त्या दलित, वंजारी आहेत म्हणून का? या समाजाच्या उमेदवाराने उभे राहायचे नाही का? हे तरी सांगा. असा बोर्ड लावून मराठा समाजाचे नुकसान होणार आहे. राज्यभर चांगले चांगले मराठा समाज नेते आहेत. त्यांच्या विरोधात देखील बोर्ड लागतील, असे छगन भुजबळ म्हणाले.

हे ही वाचा:

लोकसभा निवडणुकीतून विजय शिवतारेंनी घेतली माघार, म्हणाले..

अंबादास दानवे ठाकरे गटाची साथ सोडणार, दानवेंनी दिले स्पष्टीकरण; म्हणाले..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss