spot_img
Sunday, December 15, 2024
spot_img

Latest Posts

छगन भुजबळ यांचा हल्लबोल, ज्या शिवसेनेत तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. अश्यातच सध्या राज्यात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal) हे चांगलेच चर्चेत असल्याचं चित्र दिसून येत आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. अश्यातच सध्या राज्यात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal) हे चांगलेच चर्चेत असल्याचं चित्र दिसून येत आहे. तर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली. छगन भुजबळ यांच्या कमरेत लाथ मारून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे करत त्यांनी भुजबळांवर टीकास्त्र सोडले होते. त्यांच्या या वक्तव्याचा आता छगन भुजबळांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

तर आज नाशिकमध्ये बोलताना भुजबळ यांनी संजय गायकवाड यांच्या विधानाचा समाचार घेतला, ते म्हणाले आहेत की, ‘ गायकवाड जे बोलले ते मी ऐकलं, ते ऐकून मलाही वाईट वाटलं. जी भाषा त्यांनी काल वापरली ती बरोबर नाही. मी पण शिवसेनेत होतो, तुम्ही ज्या शिवसेनेत शिकलात त्या इन्स्टिट्यूट मध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो. त्यांच्या वक्तवव्यावर मुख्यमंत्री बघतील. मला मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याचे पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांचे आहेत. लाथ घालण्याची भाषा त्यांनी केली, मात्र ते काही होऊ शकत नाही. कारण मी आनंद दिघे आणि इतर मोठ्या शिवसेनेच्या नेत्यांचे नेता म्हणून मी काम केले आहे

यावेळी बोलत असताना भुजबळ म्हणाले आहेत की, मला अजुन काही माहिती नाही, त्यांना कशी काय माहिती मिळाली? हे मला माहीत नाही. मला कुठल्या पदाची हौस नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मी ओबीसी साठी काम करत आहे नवीन काही आता मला पाहिजे असे काही नाही. असे काही प्रपोजल मला आले नाही. माझ्या पक्षात मी मंत्री आहे, माझी काही घुसमट होत नाही.

तर पुढे मनोज जरांगे यांच्यावर बोलत असताना भुजबळ म्हणाले आहेत की, जरांगे मोठे नेते आहेत, ते काही करू शकतात. काल त्यांनी बजेट मधून आरक्षण देण्याची मागणी केली, हे मला कधी सुचले नाही

हे ही वाचा:

हिवाळ्यात पायांच्या तळवे-टाचा होतात कडक,जाणुन घ्या घरच्या घरी डेट स्किन स्वच्छ करायच्या टिप्स

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी पाचव्यांदा ईडीचा समन्स

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss