Saturday, July 27, 2024

Latest Posts

छगन भुजबळांचा राजीनामा स्वीकारू नये, अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल: ओबीसी महासंघाची मागणी

मंत्री छगन भुजबळ यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारू नये, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने (Rashtriya OBC Mahasangh) केली आहे.

मंत्री छगन भुजबळ यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारू नये, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने (Rashtriya OBC Mahasangh) केली आहे. दोन महिन्याआधीच छगन भुजबळ यांनी राजीनामा दिला होता. पण त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला नाही. यावर बोलताना ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) म्हणाले, छगन भुजबळ यांचा राजीनामा स्वीकारला तर, ओबीसी समाज एकत्र होऊन त्यांचे रक्षण करेल, रस्त्यावर उतरेल, भुजबळांच्या राजीनाम्यावर ओबीसी महासंघाने ही भूमिका घेतली आहे.

दरम्यान यावर बोलताना बबनराव तायवाडे म्हणाले, ओबीसी समाजाची सत्य बाजू मांडताना टीका होऊ नये, म्हणून त्यांनी राजीनामा दिला होता. भुजबळ यांनी मराठा समाजाचा विरोधात कधी भूमिका घेतली नाही. पण ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, ही मागणी त्यांनी लावून धरली आहे. स्वतःच्या समाजाच्या रक्षणासाठी काम करताना कोणी टीका करत असेल तर, त्याला उत्तर द्यावेच लागेल. भुजबळ यांचा राजीनामा सरकारने स्वीकारला तर, ओबीसी समाज एकत्र होऊन त्यांचे रक्षण करेल. रस्त्यावर उतरेल, असे बबनराव तायवाडे म्हणाले. राज्य सरकारने मराठा समाजाला अद्यादेश देताना मंत्री म्हणून छगन भुजबळ यांना विश्वासात घ्याला हवे होते. सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात काढलेल्या राजपत्रावर आक्षेप घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. आमची लीगल टीम राजपत्रमधील शब्द न शब्द वाचत आहे. त्यात काही आढळला तर आक्षेप घेऊ. सध्या तरी ओबीसी समाजाचा नुकसान होईल असे काहीही आम्हाला त्या अधिसूचनेत आढळलेले नाही, असे बबनराव तायवाडे म्हणाले.

न्हावी समाजाच्या एका व्यक्तीला जी वागणूक मिळाली, त्यावर चिडून भुजबळांनी अशी प्रतिक्रिया दिला आहे. न्हावी समाजाने मराठा समाजाच्या लोकांचे केस कापू नये, असे भुजबळांनी केलेल्या व्यक्तव्याशी मी सहमत नाही. तसेच हरिभाऊ राठोड यांची उंची माझ्यावर आणि भुजबळांवर बोलण्याची नाही. एक फाईल घेऊन ते सगळी कडे फिरतात आणि ओबीसी समाजाची दिशभूल करत आहे. त्यांची भूमिका योग्य असती तर सरकारने त्यांना चर्चेला बोलविले असते. हरिभाऊ राठोड यांनी कधी रस्त्यावर येऊन संघर्ष केला आहे का?असा प्रश्न तायवाडे यांनी विचारला आहे.

हे ही वाचा: 

Paytm Shares मध्ये घसरण, RBI च्या निर्बंधांनंतर Paytm च्या चिंतेत वाढ

‘ठरलं तर मग’ मालिकेत माथेरानमध्ये सायलीचा पार्टीत धिंगाणा,अर्जुन कसा सांभाळु शकेल ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss