५ फेब्रुवारी म्हणजेच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेयर बाजाराची सुरुवात घसरण होऊन झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्बंधानंतर पेटीएम (Paytm) च्या चिंतेत वाढ झाली आहे. पेटीएमचे शेयर्स आज १० टक्क्यांनी कोसळले आहेत. बीएसई (BSE SENSEX) कडून पेटीएमच्या स्टॉक्सच्या लोअर सर्किटची लिमिट २० टक्क्यांवरून १० टक्के इतकी घटवण्यात आली होती. गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ नये, यासाठी बीएसईने लिमिट बदलले होते. मात्र, तरीही आज सुद्धा पेटीएमच्या सामान भागात १० टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यासोबतच, लोअर सर्किट लागले असून मागच्या तीन सेशनमध्ये पेटीएमच्या शेयर्समध्ये ४२ टक्क्यांची घसरण झाली होती.
पेटीएम (Paytm) ची मागील दोन सेशनमध्ये १७ हजार कोटींनी मार्केट कॅपमध्ये घट झाली आहे. पेटीएमची पॅरेण्ट कंपनी वन ९७ कम्युनिकेशनकडून माध्यमांमध्ये ईडीची चौकशी आणि त्या संदर्भातल्या बातम्यांचा खुलासा करण्यात आला आहे. वन ९७ कम्युनिकेशनकडून ईडी चौकशीचे वृत्त फेटाळण्यात आले आहे. वन ९७ कम्युनिकेशन (One 97 Communications Ltd Share Price)यांच्याकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून कंपनी तसेच कंपनीचे संस्थापक आणि सीईओ यांची मनी लॉन्डरिंग प्रकरणी चौकशी करण्यात येत नाही. आमचे प्लॅटफॉर्म वापरणारे व्यापारी चौकशीला सामोरे जात आहेत. आम्ही भारतीय कायद्यांचे पालन करत आहोत, तसेच आम्ही सर्व आदेश गांभीर्याने घेत आहोत, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
नेमेके प्रकरण काय?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) पेटीएमला (Paytm) बँकिंग सेवा देणे बंद केले. आता पेटीएम पेमेंट्स बँक देखील पुढील महिन्याच्या सुरुवातीला आपला ऑपरेटिंग परवाना गमावू शकते. याचा सरळ अर्थ असा होईल की, पेटीएम बँकिंग सेवा ऑपरेट करू शकणार नाही. बुधवारी RBI ने Paytm पेमेंट्स बँकेला आदेश दिले होते, ज्याची Paytm च्या मूळ कंपनीमध्ये ४९% हिस्सेदारी आहे, नियमांचे पालन न केल्याबद्दल मोबाईल वॉलेट व्यवसाय तसेच इतर क्रियाकलाप बंद करण्याचे आदेश दिले होते. आरबीआयने २९ फेब्रुवारीनंतर पेटीएम पेमेंट्स बँकेशी संबंधित व्यवहार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. आरबीआयने पुढे सांगितले की, ग्राहकांनी पेटीएम वॉलेट आणि या बँक खात्यात पैसे जमा करू नयेत. मात्र, ते जमा केलेली रक्कम काढू शकतात. बुधवारी ही बातमी येताच पेटीएमचे शेअर्स गुरुवार आणि शुक्रवारी विक्रमी २०-२० टक्क्यांनी घसरले.
हे ही वाचा:
हिवाळ्यात पायांच्या तळवे-टाचा होतात कडक,जाणुन घ्या घरच्या घरी डेट स्किन स्वच्छ करायच्या टिप्स
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी पाचव्यांदा ईडीचा समन्स