उद्या सर्वात मोठ्या प्रकल्पाचे मुख्यमंत्री eknath shinde करणार शुभारंभ

देशामधीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठी आणि ऐतिहासिक समूह विकास योजना सुरु होणार आहे.

उद्या सर्वात मोठ्या प्रकल्पाचे मुख्यमंत्री eknath shinde करणार शुभारंभ

देशामधीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठी आणि ऐतिहासिक समूह विकास योजना सुरु होणार आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ सोहळा ५ जून रोजी आयोजित करण्यात येणार आहे आणि या प्रकल्पाचा शुभारंभ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर या शुभारंभाच्या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील हजेरी लावली होती. ठाणे शहराचा विकास व्हावा यासाठी पायाभूत सुविधांचा पुनर्विकास करण्यात यावा आणि यासाठी एकूण ४५ नागरी पुनरुत्थान आराखडे तयार करण्यात आले. त्याचे एकूण क्षेत्रफळ १५०० हेक्टर एवढे आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या शुभारंभ होणार आहे. ४५ आराखड्यांपैकी अत्यंत दाटीवाटीने क्षेत्र असलेल्या किसननगर नागरी पुनरुत्थान आराखडा क्र. १२ मधील पुनरुत्थान योजना क्र. १ आणि २ च्या कामाला उद्या पासून सुरुवात होणार आहे. ठाण्यामध्ये अनेक धोकादाय इमारती आहेत त्या इमारतींचा सामूहिक पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून नियमावली तयार करण्यात आली आहे. धोकादायक, अनधिकृत आणि अधिकृत इमारत पुन्हा उभ्या केल्याने विकास होणार आहे. नागरी पुनरुत्थान १ व २ ची अंमलबजावणी सिडको या शासनाच्या कंपनीमार्फत होणार आहे. समूह विकास योजनेच्या कामकाज सांभाळण्यासाठी कशिश पार्क येथे क्लस्टर पुनर्विकासचे कार्यालय निर्माण करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

‘Zara hatke zara bachke’ ने पहिल्याच दिवशी केली कोटींची कमाई!

साराने केला शर्मिला टागोर सोबत अभिनय, व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल

Bigg Boss OTT’ S2 मध्ये होणार ‘या’ गायकाची Entry?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version