Saturday, May 18, 2024

Latest Posts

BJP विरोधात आरोपांचा हंबरडा फोडून…Chitra Wagh यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजपवर टीकास्त्र उगारले. त्यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सोशल माध्यमावरून व्यक्त होत उत्तर दिले आहे. जनतेचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?  

उद्धवजी…..!

गद्दारीचा घिसापीटा राग आळवताना आपण आमच्या पाठीत खंजीर खुपसलात, हे तुम्ही विसरू नका. अशा खंजीरखुपशांसोबतची तुमची आघाडी म्हणजे भ्रष्टाचारातल्या समस्त ढवळ्या-पवळ्या जमातीचं मनोमीलन आहे. त्यामुळे  भाजपविरोधात आरोपांचा खोटा हंबरडा फोडून काही साध्य होणार नाही…. जनतेचा मोदीजींवर विश्वास आहे; कारण नरेंद्र मोदी आपल्या दिलेल्या प्रत्येक गॅरंटीला जागलेत. आताही ४०० पारचं उद्दिष्ट साध्य करून भाजपसह महायुतीचा विजयरथ दिमाखात उधळणार…मागच्या दोन्ही वेळांप्रमाणे जनता तुमची वेसण करकचून आवळणार…

काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

देवेंद्र फडणवीस यांचा येण्या-जाण्याचा, राहण्या-खाण्याचा खर्च मी स्वतः करतो, पण त्यांनी मणिपूर आणि लडाखला जाऊन यावं, त्यांच्या सर्व खर्च मी करतो, त्यांच्या हॉटेलचा खर्च देखील मी करतो. पण त्यांनी मणिपूर आणि लडाखला जाऊन तेथील परिस्थिती पाहावी. देवेंद्र फडणवीस यांनी अरुणाचल प्रदेश आणि दार्जिलिंगला जावं. निर्वासित काश्मिरी पंडितांना भेटावं. बॉयकॉट बॉलीवूड म्हणणारे बॉलीवूडच्या नादी लागलेत, त्यामुळे एखाद प्रोड्युसर घेऊन त्यांनी मणिपूर फाईल्स चित्रपट काढावा, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.

सगळे ठग भाजपमध्ये गेले, त्यामुळे आम्ही…

दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलताना संजय राऊत यांनी देखील भाजपवर टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, सगळे ठग भाजपमध्ये गेले, त्यामुळे आम्ही ठगमुक्त झालो आहोत. भाजपची केविलवाणी धडपड सुरु आहे. खरे ठग कोण आहेत, हे निवडणूक रोख्यांचं भांडं फुटल्यामुळे सर्वांसमोर आलेलं आहे. ठगांचा मेळा त्यांच्याकडे, राष्ट्रवादी काँग्रेसमधले सर्व मुख्य ठग त्यांच्याकडे गेल्यामुळे पक्ष आता मोकळा झाला अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल ठग होते, हे मी किंवा उद्धव ठाकरे यांनी नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. त्यांनी सगळे ठग घेतल्यामुळे आम्ही ठगमुक्त झालो, असे संजय राऊत म्हणाले.

Latest Posts

Don't Miss