Saturday, July 27, 2024

Latest Posts

विचाराचा झेंडा समाधीनंतर सुद्धा जिवंत राहतो, काय म्हणाले BACCHU KADU?

छत्रपती संभाजीनगर येथे आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोर्टात केस पेंडिंग असताना सुद्धा इथे उमेदवारी दिल्या जातात या तानाशाहीच्या विरोधात आमची लढाई सुरु असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. अमरावती लोकसभा मला असं वाटतं की, आता अमरावतीचं काही राहिलेलं नाही. पोस्टमार्टम झालेला आहे, फक्त निकाल बाकी आहे आणि तो म्हणजे प्रहारचाच असल्याचे आमदार बच्चू कडू म्हणाले. महायुतीबाबत आमदार कडू म्हणाले की, आमची लढत ही मैत्री पूर्ण आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये तरी आता पुढचा निर्णय युतीने घ्यावा की, आमची आणि त्यांची लढत त्यांच्या विरोधात नाही. आम्ही युतीतून बाहेर जावं की राहावं, तो त्यांचा निर्णय सध्या महायुतीकडे आहे त्यांनी जो निर्णय घेतला त्यांचे मी स्वागत करू, असे ते म्हणाले.

नवनीत राणा यांच्याबद्दल हायकोर्टाने रिझल्ट दिला. त्यात त्यांनी स्पष्ट सांगितले की, याच्यामध्ये सगळी बनवाबनवी झालेली आहे आणि गुन्हे दाखल करण्यापासून हा देशद्रोह आहे. असे असताना अडीच वर्षे सर्वोच्च न्यायालय निकाल देत नाही. कोर्टात केस पेंडिंग असताना सुद्धा इथे उमेदवारी दिल्या जातील या तानाशाहीच्या विरोधात आमची खरी लढाई आहे, असा हल्लाबोल बच्चू कडू यांनी केला. रवी राणांची जी वागणूक आहे ती अतिशय राग येणारी आणि संताप देणारी आहे. म्हणून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असते. यामुळे मी स्वतःचा अपमान सहन करेल पण कार्यकर्ते म्हणतात की हा अपमान सहन करण्यापेक्षा आपण युतीच्या बाहेर निघालेलं बरं. त्याच्यामुळे आमचा प्रहार पक्ष कायम राहिला पाहिजे म्हणून आम्ही अमरावतीमधून उमेदवारी टाकली असल्याचे आमदार कडू यांनी सांगितले.

मुंबईच्या दौऱ्यानंतर जरांगे पाटील आणि माझा काही संबंध आला नाही त्यानंतर त्यांच्यासोबत बोलणं झालं नाही. मी त्यांच्यासोबत गेलो होतो. त्यावेळेस राजकीय विचार नव्हता तर सामाजिक विचार होता. त्यांनी निवडणुका आमच्या सोबत लढवावी यासाठी मी त्यांना फोन करणार नाही, कारण आमचा तो स्वभाव नाही. आता ब्रह्मदेव खाली आला तरी आम्ही निवडणूक लढणारच. विचाराचा झेंडा समाधीनंतर सुद्धा जिवंत राहतो तो आम्ही कायम ठेवणार असे प्रतिपादन यावेळी आमदार बच्चू कडू यांनी केले. नितेश राणे काय सांगणार ब्रह्मदेवापेक्षा कोणी मोठा आहे का? ते आले तरी आम्ही निवडणूक लढणारच. नितेश राणे अजून खूप छोटा आहे. त्याला अजून बरीच समज यायची आहे. असे म्हणत आमदार बच्चू कडू यांनी नितेश राणे यांच्यावर टीकास्त्र उगारले.

हे ही वाचा:

महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता, दिल्लीत आज महत्वाची बैठक कर्णधार हार्दिक पांड्याला चाहत्यांनी केले ट्रोल, पोस्ट शेअर करत सोनू सूदने दिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss