Saturday, July 27, 2024

Latest Posts

महाविकास आघाडीच्या तारखेवरून गोंधळ, प्रकाश आंबेडकर म्हणाले…

२७ फेब्रुवारीला महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) घटक पक्षांच्या नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्याशी चर्चा केली.

२७ फेब्रुवारीला महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) घटक पक्षांच्या नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्याशी चर्चा केली. या बैठकीला जाण्यासाठी प्रकाश आंबेडकर तयार आहेत. मात्र २७ फेब्रुवारीला पुण्यामध्ये होणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता परिवर्तन महासभेमुळे महाविकास आघाडीच्या बैठकीला जाणे शक्य होणार नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे. ही माहिती त्यांनी त्यांच्या ट्विटर वरून दिली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील यांचा काल फोन आला होता. त्यांनी २७ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलेल्या बैठीकीबद्दल सांगितले. त्यावर आम्ही त्यांना सांगितले, २७ तारखेला आम्ही बैठकीला येऊ शकत नाही. वंचित बहुजन आघाडीची पुण्यामध्ये जाहीर सभा आहे. त्या सभेसाठी महाराष्ट्राची पूर्ण राज्य कमिटी पुण्यात असणार आहे.जयंत पाटील यांनी विनंती केली आहे २८ तारखेला शक्य असल्यास आपण बैठक ठरवू, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. जयंत पाटील यांनी पक्षातील लोकांसोबत चर्चा करून सांगतो असे सांगितले आहे. आज सकाळी खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी २७ फेब्रुवारीला बैठकीला जाणार असल्याचे सांगितले. पण आम्ही संजय राऊत यांना सांगतो पुण्यात २७ फेब्रुवारीला जाहीर सभा असणार आहे. त्यामुळे आम्हाला २७ फेब्रुवारीला बैठकीला उपस्थित राहण्यास जमणार नाही. पण हीच तारीख जर २८ फेब्रुवारी असेल तर आम्ही येऊ, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रामध्ये दोन गट पडले आहेत. एका गटाचे नेतृत्व मनोज जरांगे करत आहेत तर दुसऱ्या बाजूला ओबीसी, भटके आहेत. परंतु आमच्या ताटातलं काढून घेऊ नका. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. शासनाने जी भूमिका घ्याला हवी ती भूमिका घेताना शासन दिसत नाही. उलट हा प्रश्न अजून चिघळत चालला आहे. शासनाने यावर तोडगा काढला पाहिजे. मुंबईमध्ये मनोज जरांगे यांनी केलेल्या आंदोलनानंतर हा प्रश्न सुटेल असं वाटलं होत मात्र हा प्रश्न अजूनच वाढत चालला आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हे ही वाचा:

लवकरच ते शिवसेनेची मशाल घेऊनही राज्यात फिरतील – Sanjay Raut

हिंमत असेल तर मुख्यमंत्री व जरांगे यांच्यात काय बोलणे झाले ते जाहीर करा- नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss