Sunday, April 28, 2024

Latest Posts

लवकरच ते शिवसेनेची मशाल घेऊनही राज्यात फिरतील – Sanjay Raut

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला तुतारीचे चिन्ह प्राप्त झाले. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तुतारीचे रणशिंग फुंकणाऱ्या माणसाचे चित्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला बहाल केले आहे. आता याच चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची निवडणूक लढवली जाणार आहे. याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असे नाव दिले होते. त्यानंतर चिन्हावर शिक्कामोर्तब करण्यात आला. याच अनुषंगाने, तुतारी या चिन्हाचे अनावरण रायगडावर करण्यात आले. त्यानंतर २५ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातारा दौऱ्यावर होते. त्यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांचे मोठ्या उत्साहात तुतारीच्या गजरात स्वागत करण्यात आले. याविषयीची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. याच मुद्द्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. फडणवीस यांनी माहविकास आघाडीच्या विजयाची तुतारी फुंकल्याबद्दल त्यांचे आभार! असे संजय राऊत ट्विटरच्या माध्यमातून म्हणाले आहेत.

काय आहे संजय राऊत यांचे ट्विट?

राष्ट्रवादी काँग्रेस(खरी) च्या प्रचाराची तुतारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सातारा येथे फुंकली..हा एक अपूर्व योगायोग! लवकरच ते अशा प्रकारे शिवसेनेची मशाल घेऊनही राज्यात फिरतील. ही तर श्रींची इच्छा! फडणवीस यांनी माहविकास आघाडीच्या विजयाची तुतारी फुंकल्या बद्दल त्यांचे आभार!

काय होते देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट?

छत्रपती शिवाजी महाराज की जय! निनाद तुतारीचा..! सातारा येथील जलमंदिर पॅलेसमध्ये तुतारीच्या गगनभेदी ललकारात जेव्हा स्वागत करण्यात आले… या उत्साहवर्धक स्वागतासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे मनापासून आभार!

राज्याची परिस्थिती बदलण्यासाठी जनतेचे राज्य आणावे लागेल

ही तुतारी एका संघर्षाला सुरुवात करण्यासाठी प्रेरणा देणारी आहे. जनतेसाठी ही आनंदाची तुतारी असेल. राज्याची परिस्थिती बदलण्यासाठी जनतेचे राज्य आणावे लागेल असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रायगड किल्ल्यावर पक्षाच्या तुतारी चिन्हाच्या अनावरण प्रसंगी बोलताना म्हटले होते.

हे ही वाचा:

हिंमत असेल तर मुख्यमंत्री व जरांगे यांच्यात काय बोलणे झाले ते जाहीर करा- नाना पटोले

Rohit Pawar यांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप, सागर बंगला हा कुटुंब फोडण्यासाठी…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss