Saturday, March 2, 2024

Latest Posts

काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द

नागपूरमधील (Nagpur) जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी (Bank Scam) काँग्रेस आमदार सुनील केदार यांच्यावर करावी करण्यात आली होती.

नागपूरमधील (Nagpur) जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी (Bank Scam) काँग्रेस आमदार सुनील केदार यांच्यावर करावी करण्यात आली होती. त्यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच आता आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांनी विधिमंडळा सुनील केदार यांच्या शिक्षेची संदर्भातील माहिती दिली आहे. त्यानंतर आता विधिमंडळाकडून सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे.

२००१०-२००२ मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने होम ट्रेड लिमिटेड, इंद्रमणी मर्चंट्स प्रायव्हेट लिमिटेड, सेंचुरी डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्विसेस आणि गिलटेज मॅनेजमेंट सर्विसेस या सर्व खाजगी कंपनीच्या मदतीने बँकेच्या सरकारी रक्कमेतुन शेअर्स खरेदी केले होते. पण या कंपनीकडून बँकेला कोणत्याही प्रकारची रोख रक्कम मिळाली नाही. तसेच ते शेअर्स बँकेच्या नावावर झाले नाही. विशेष बाब म्हणजे या सर्व खाजगी कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या. या काही खाजगी कंपन्यांनी कधीही बँकेला रोख रक्कम आणि बँकेच्या नावावर कोणतेही शेअर्स दिले नाही. त्यानंतर फौजदारी गुन्ह्याची नोंद दाखल करून सीआयडीकडे ही केस सोपवण्यात आली. या घटनेचा तपास केल्यानंतर २२ नोव्हेंबर २००२ रोजी सीआयडीने कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते.तेव्हापासून हा खटला विविध कारणांनी प्रलंबित राहिले होते.

सध्या सुनील केदार यांच्यावर शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. मायग्रेनचा त्रास सुनील केदार यांना जाणवू लागल्यामुळे त्यांना तीव्र डोके दुखी असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. सुनील केदार यांना ५ वर्षाचा करावासा साडे बारा लाख रुपये दंड शिक्षा सुनावण्यात आली आहे. मायग्रेनमुळे तीव्र डोकेदुखीसह छातीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. काल रात्री डॉक्टरांनी केदार यांच्या ईसीजी, रक्ताच्या चाचण्या केल्या आहेत. छातीतील इसीजीमध्ये थोडे बदल आढळून आले.

हे ही वाचा:

‘उमंग 2023’ मध्ये बॉलीवूडमधील कलाकारांची मांदियाळी,सेलिब्रेटींची ग्रॅंन्ड एन्ट्री

मेहंदी रचली गं ; स्वानंदी-आशिषची लगीनसराई,मेहंदीचे फोटो आले समोर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss