Saturday, July 27, 2024

Latest Posts

१६ फेब्रुवारीपर्यंत मराठा आरक्षणावर हरकत घेण्याची मुदत, छगन भुजबळांची विनंती

मराठा आरक्षणाचा मागील काही दिवसांपासून चर्चेत होता.

मराठा आरक्षणाचा मागील काही दिवसांपासून चर्चेत होता. आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईच्या दिशेने येण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अखेर आज त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मराठा समाजच्या जुन्या कुणबी नोंदींच्या आधारे सग्या-सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने रात्री २. ३० वाजताच्या सुमारास मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राजपत्र आणि अध्यादेश जारी करत मराठा आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय दिला. या मोठ्या निर्णयामुळे कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्याच्या सग्या-सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने मराठ्यांना कुणबी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या जारी केलेल्या अध्यादेशावर १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती घेतल्या जाणार आहेत.

राज्य सरकारने २६ जानेवारी २०२४ ला जारी केलेल्या अध्यदेशात म्हटले आहे, मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्याच नोंदींच्या आधारावर सर्व सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या नवीन तयार करण्यात आलेल्या नियमनामुळे बाधा पोहोचत असलेल्या व्यक्तींची हरकत लक्षात घेऊन १६ फेब्रुवारी पर्यंत हरकती प्राप्त झाल्यानंतर अध्यादेश विचारात घेण्यात येईल. या अध्यादेशा संबंधित कोणतीही व्यक्ती किंवा कोणत्याही हरकती प्राप्त झाल्यास, त्याआधी १६ फेब्रुवारीपर्यंत आलेल्या हरकती सरकारकडून विचारात घेण्यात येतील.

सगे सोयरे कायद्याच्या चौकाटीत बसत नाही, असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. त्यावेळी त्यांनी आपले मत मांडले. भुजबळ म्हणाले, मला मराठा समाजाच्या निदर्शनास आणून द्याच आहे की, तुम्ही ओबीसी समाजाचे जे काही १७-१८ टक्के आरक्षण शिल्लक आहे, त्यामध्ये येण्याचा आनंद मिळतोय. तुम्ही जिंकलाय असे तुम्हाला वाटतंय. पण, दुसरी एक बाजू लक्षात घ्या की, या १७-१८ टक्क्यांमध्ये आता जवळजवळ ८० ते ८५ टक्के लोकं येतील. हे सगळे एकाच ठिकाणी येतील. EWS साठी जे १० टक्के आरक्षण मिळत होते, ते ८५ टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळत होते, ते आरक्षण आता मराठ्यांना मिळणार नाही. ओपनमध्ये उरलेले ४० टक्के आरक्षण तुम्हाला मिळत होतं, ते सुद्धा आता तुम्हाला मिळणार नाही. एकूण ५० टक्क्यांमध्ये तुम्ही खेळत होता, १० टक्के EWS आणि उरलेले ४० टक्के. या ५० टक्क्यांमध्ये तुम्हाला संधी होती, ती संधी गमावून तुम्हाला या सगळ्यावर पाणी सोडून तुम्हाला या १७-१८ टक्क्यांसाठी ३७४ जातींसोबत तुम्हाला झगडावं लागेल, असे भुजबळ म्हणाले.

हे ही वाचा:

आपण आजवर ५० टक्क्यांच्या समुद्रात पोहत आहोत – मंत्री छगन भुजबळ

‘फायटर’ चा बॉक्स ऑफिसवर डंका,प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा चित्रपटाला फायदा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss