Saturday, July 27, 2024

Latest Posts

देवेंद्र फडणवीस यांना सध्या विपश्यना करण्याची गरज; संजय राऊतांचा खेचक टोला

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांना सध्या विपश्यना करण्याची गरज आहे, असे संजय राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीसांना दोन ज्युनिअरच्या हाताखाली काम करावे लागत आहे. राज्याचा कारभार दिल्लीतून सुरु आहे. महाराष्ट्र दिल्लीचं पायपुसनं झालं आहे, अस आम्ही त्यामुळेच म्हणत आहोत. मुंबईचा सौदा सुरू आहे आणि तो शिवसेना होऊ देणार नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर घणाघात केला आहे. राजधानी दिल्लीत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी टीका केली आहे.

इंडिया आघाडीची उद्या दिल्लीत दुपारी ३ वाजता बैठक होत आहे. या बैठकीसाठी सगळ्या घटकपक्षांना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी निमंत्रण दिलं आहे. सगळे प्रमुख नेते या बैठकीला येणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा एक पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. पण माझी माहिती आहे की ते इंडियाची ही बैठक आटोपून पुढे जाणार आहेत. उद्धव ठाकरे आज रात्री दिल्लीत येत आहेत. उद्या बैठक आणि महत्वाच्या भेटीगाठी आहेत. उद्या ते बैठकी आधी उद्धव ठाकरे केजरीवाल यांची भेट घेणार आहेत, असे संजय राऊत म्हणाले. हेमंत सोरेन हे देखील बैठकीला येणार आहेत. जर येता आले नाही तर ते झूम द्वारे सहभागी होतील. २०२४ च्या दृष्टीने ही बैठक महत्वाची आहे. फक्त चर्चा नाही तर अनेक निर्णय बैठकीत घेतले जातील. लोकशाहीचं रक्षण करणं हा बैठकीच प्रमुख अजेंडा असेल. जागावाटपाबाबत देखील चर्चा होईल, असे राऊतांनी सांगितले आहे.

संभाजीराजे यांचा मला फोन आला होता. पण उद्धव ठाकरे येत असल्याने मला त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांनी बोलावलेल्या बैठकी बाबत आमची सकारात्मकता आहे. जर मला वेळ काढता आला तर मी स्वतः किंवा शिवसेनेचा मोठा नेता उपस्थित राहील. एकमेकांवर खालच्या भाषेत बोलणं सर्वांनीच टाळलं पाहिजे. छगन भुजबळ हे मोठा समाजाचे नेते आहेत. मनोज जरांगे पाटील हे देखील मोठ्या समाजाचं नेतृत्व करत आहेत. राज्याचं वातावरण खराब होणार नाही याची काळजी घ्यावी, असे राऊतांनी म्हंटले आहे.

Latest Posts

Don't Miss