गजानन कीर्तिकरांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

राज्यातील सत्तेत एकत्र असणाऱ्या भाजप आणि शिंदे गटात वरुन सर्व चांगलं दिसत असले तरी दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याचे संकेत मिळत आहेत. स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेले शिंदे गटाचे ज्येष्ठ खासदार गजानन कीर्तिकर यांच्या एका वक्तव्यामुळे या चर्चेला सुरुवात झाली आहे.

गजानन कीर्तिकरांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

राज्यातील सत्तेत एकत्र असणाऱ्या भाजप आणि शिंदे गटात वरुन सर्व चांगलं दिसत असले तरी दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याचे संकेत मिळत आहेत. स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेले शिंदे गटाचे ज्येष्ठ खासदार गजानन कीर्तिकर यांच्या एका वक्तव्यामुळे या चर्चेला सुरुवात झाली आहे. भाजपकडून शिंदे गटाच्या १३ खासदारांना सापत्न वागणूक मिळत असल्याचे कीर्तिकर यांनी म्हटले आहे. आम्ही १३ खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलो. आमचा शिवसेना पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक आहे. त्यामुळे एनडीएचा घटकपक्ष असल्याप्रमाणेच आमची कामं झाली पाहिजेत. मी हा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मांडला. भाजपकडून आम्हाला घटकपक्षाचा दर्जा मिळाला पाहिजे. त्याप्रमाणे आम्हाला वागवले गेले पाहिजे. पण भाजपकडून आमच्या खासदारांना सापत्न वागणूक मिळते, असे गजानन कीर्तिकर यांनी म्हटले. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी अहमदनगरमध्ये विकासकामांच्या उद्घाटनासाठी आले होते. तेव्हा गजानन कीर्तिकरांनी केलेल्या विधानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीसांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. “गजानन कीर्तिकरांनी असं कुठेही म्हटलं नाही. या सर्व कल्पोकल्पीत बातम्या आहेत,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिवसेना शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजपाबद्दल केलेल्या दाव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गजानन कीर्तिकरांनी खंत व्यक्त केली होती. आम्ही १३ खासदार एकनाथ शिंदेंबरोबर आलो असून, एनडीएचा घटक पक्ष आहोत. यापूर्वी आम्ही एनडीएचा घटकपक्ष नव्हतो. त्यामुळे एनडीएचा भाग असल्याने आमची काम झाली पाहिजेत. घटकपक्षाला दर्जा दिला पाहिजे, ही आमची मागणी आहे. भाजपाकडून आम्हाला सापत्न वागणूक देण्यात येत आहे,” असं कीर्तिकरांनी म्हटलं होतं.गजानन कीर्तिकर यांनी आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा ( एनडीए ) घटक पक्ष आहोत. तरीही, भाजपाकडून आम्हाला सापत्न वागणूक मिळत आहे,” असं वक्तव्य गजानन कीर्तिकरांनी केलं आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.कीर्तिकरांनी लोकसभेच्या २२ जागांवर दावा केला आहे, याबाबत प्रश्न विचारल्यावर देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, आमच्यात कोणतीही समस्या नाही. शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष समन्वयाने काम करत आहेत. आमच्यात सर्व गोष्टी ठरतील तेव्हा तुम्हाला सांगू असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा:

राहुल गांधी यांना मिळाला दिलासा

राजकारणात आता संजय विरुद्ध संजय असा नवा वाद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version