Saturday, July 27, 2024

Latest Posts

देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर झालेल्या आरोपांवरून विरोधकांवर निशाणा साधला

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर झालेल्या आरोपांवरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करण्यात आल. त्यावर ते जेलमध्ये सुद्धा गेले. जेलमध्ये गेल्यानंतर त्यांचे मंत्रिपद काढून घेण्यात आले नाही. त्यामुळे आधी याचे उत्तर द्या आणि त्यानंतर आम्हाला विचारा देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. विशेष बाब म्हणजे यावेळी खुद्द नवाब मलिक देखील सभागृहात उपस्थित होते.

ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, दाऊद इब्राहिमसोबत संबंध असल्याचे आरोप केले आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्ताधारी पक्षांवर केला होता. यालाच उत्तर देतांना फडणवीस म्हणाले की, “मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते. प्रत्यक्ष व्यक्ती जेलमध्ये असताना देखील, त्याला आम्ही मंत्रीपदावरून काढणार नाही अशी भूमिका ज्या नेत्यांनी घेतली ते आता इथे भूमिका मांडत आहे. आम्ही कुणाच्याही मांडीला मांडी लावून बसलो नाही. मी आणि मुख्यमंत्री एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलो आहे. आमच्या बाजूला अजितदादा बसले आहे. त्यामुळे आमची काळजी करू नका. पहिल्यांदा तुम्हाला हे उत्तर द्यावं लागेल, देशद्रोहाचा आरोप झाल्यावर देखील, आणि ते जेलमध्ये असताना सुद्धा तुम्ही त्यांना मंत्रिपदावरून का काढले नाही. याचे उत्तर आधी द्या त्यानंतर आम्हाला विचारा, असे फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:

प्रचारासाठी सर्वांना वेळ आहे, पण शेतकऱ्यांसाठी नाही । Vijay Wadettiwar | Farmers | Winter Session | Maharashtra State Council

रणबीरच्या ‘ॲनिमल’चा बॉक्स ऑफिसवर धुमधमाका, सहा दिवसांत केली रेकॉर्डब्रेक कमाई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss