Friday, April 19, 2024

Latest Posts

संजय राऊतांनी ट्विट केलेल्या फोटोमुळे सगळीकडे खळबळ, पुण्यातील गुंडाच्या हाती भगवा झेंडा

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Thackeray group MP Sanjay Raut) मागील काही दिवसांपासून सत्ताधारी नेत्यांसोबतचे काही फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत आहेत.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Thackeray group MP Sanjay Raut) मागील काही दिवसांपासून सत्ताधारी नेत्यांसोबतचे काही फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत आहेत. असाच एक फोटो त्यांनी आज शेअर केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पुण्यातील (Pune) नामचीन गुंड जितेंद्र जंगम (Jitendra Jangam) यांचाही फोटो चांगलाच वायरल झाला आहे. जितेंद्र जगम यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता त्यावेळीचा फोटो राऊत यांनी शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी शेअर केलेल्या ट्विटर फोटोमध्ये एकनाथ शिंदे यांच्या सोबत पुण्यातील नामचीन गुंड जितेंद्र जंगम दिसत आहे. मागच्या वर्षी त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळचा हा फोटो आहे. जितेंद्र जंगमवर हत्येचा प्रयत्न, मारामारी, खंडणी अश्या ७ गंभीर गुन्हेची नोंद आहे. २०२१ मध्ये जितेंद्र जंगमवर त्याच्या टोळीसह मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर २०२३ ला त्याची सुटका करण्यात आली. त्या सुटकेनंतर जितेंद्र याने शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता त्यावेळसाचा हा फोटो आहे. हाच फोटो संजय राऊत यांनी ट्विट केला आहे.

संजय राऊत यांनी ट्विट करत लिहिले आहे, पुण्याचे नवे पोलीस आयुक्त महोदयांनी काल म्हणे गुंडांची परेड घेऊन इशारा दिला. राजकारण्यांच्या आसपास फिरकायचे नाही वैगरे..छान!.. काही गुंड टोळ्या आणि त्यांचे प्रमुख मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत थेट मींधे गँगमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांची परेड काढणार काय? हातात भगवा घेतलेले हे महात्मा कोण आहेत? हा पुण्यातला गुन्हेगार आहे. याच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न, चोरी, अपहरण असे गुन्हे आहेत व मोकामधुन नुकताच बाहेर आला आहे महाराष्ट्रात गुंडांनी गुंडासाठी चालविलेले राज्य! (काल सरकारचे बाळराजे कोठे होते? त्यांच्या खास गँग बरोबर सुलतानपूर रिसॉर्ट मध्ये साग्र संगीत बरेच काही करीत होते..या राज्याचे कठीण आहे), असे संजय राऊत यांनी लिहिले आहे.

हे ही वाचा: 

शरद पवारांना संपवण्यासाठी त्यांची राजकीय हत्या केली जात आहे – जितेंद्र आव्हाड

जनता मूर्ख नाही,सगळं जाणते,तेजस्विनीने केलेलं हे ट्विट नेमकं कोणासाठी ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss