Tuesday, April 23, 2024

Latest Posts

शरद पवारांना संपवण्यासाठी त्यांची राजकीय हत्या केली जात आहे – जितेंद्र आव्हाड

६ फेब्रुवारी २०२४ ला निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला.

६ फेब्रुवारी २०२४ ला निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला.या निर्णयात निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळाचे चिन्ह हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलं तर शरद पवार यांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेत्यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे. त्यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, शरद पवार यांची राजकीय हत्या करण्यासाठी हा कट रचला जात आहे, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे.

आम्ही निवडणूक आयोगाकडे पर्याय मागितले होते पण त्यांनी आम्हाला पर्याय दिलेच नाहीत. आमच्याकडे तसे पत्र आहे. याचाच अर्थ निवडणूक आयोग एकतर खोटं तरी बोलत आहे किंवा निवडणूक आयोग विसर बोला आहे हे सिद्ध झालं आहे. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरून आम्ही त्यांना तीन पर्याय दिले होते पण त्याकडे लक्षच दिले गेले नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. यावर बोलताना पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले, शरद पवार यांना संपवण्यासाठी राजकीय हत्या केली जात आहे. त्यांचे राजकीय वजन कमी करण्यासाठी मोठे मोठे कट रचले जात आहेत. पण या सगळ्यामुळे महाराष्ट्राच्या भावना किती दुखावल्या जात आहेत याची कल्पना निवडणूक आयोगाला नाही. निवडणूक आयोग हेच जर योग्य कायदेशीररित्या चालणार नसेल आणि बेकायदेशीररित्या निर्णय घेणार असेल तर हे सगळं हास्यस्पद आहे. ८४ वर्षाच्या माणसाला संपवण्यासाठी अवधी मोठी राजकीय ताकद खर्च केली जात आहे. तसेच त्यांना मरण यातना देणे हे अजित पवार आणि कंपनीला शोभत नाही, अश्या शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी ताशेरे ओढले आहेत.

निवडणूक आयोगाला आम्ही पर्याय दिला होता पण दोन्ही पक्ष म्हणतं आहेत कि पर्यायच दिले नाही. याचा अर्थ निवडणूक आयोग खोटं बोलत आहे. निवडणूक आयोगासारखी महत्त्वाची संस्था जर कायदेशीररित्या चालणार नसेल आणि बेकायदेशीररित्या निर्णय घेणार असेल तर हे सगळं हास्यास्पद आहे, असे म्हणत निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. तसेच निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय आम्हाला मान्य नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

हे ही वाचा: 

उल्हासनगर गोळीबार प्रकरणी आरोपी गणपत गायकवाड यांचा पोलीस ठाण्यात अन्नत्याग

तरुणाईला भुरळ पाडणारं अवधूत गुप्ते यांच्या ‘दूर दूर’ गाण्याचा टिझर प्रदर्शित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss