Saturday, July 27, 2024

Latest Posts

आमदार रोहित पवार यांची तिसऱ्यांदा ईडी चौकशी, वकिलामार्फत कागदपत्र सादर

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची मागील काही दिवसांपासून ईडी चौकशी सुरु आहे.

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची मागील काही दिवसांपासून ईडी चौकशी सुरु आहे. आज त्यांची पुन्हा एकदा ईडीकडून चौकशी होणार आहे. पण आज रोहित पवार सरकारी वकिलामार्फत काही कागदपत्रे ईडीकडे जमा करणार आहेत. तसेच आज रोहित पवार ईडी चौकशीला हजर राहणार नाहीत. मागील काही दिवसांपासून एका कथित घोटाळ्याप्रकरणी रोहित पवार यांची चौकशी सुरु आहे. याआधी मुंबईमध्ये रोहित पवार यांची ईडी कार्यालयात चौकशी झाली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी शीखर बँक संबंधित मागील काही दिवसांपासून आमदार रोहित पवार यांची ईडी चौकशी चालू आहे. रोहित पवार यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहेत. यापूर्वी रोहित पवार यांची २४ जानेवारीला १२ तास चौकशी करण्यात आली होती तर १ फेब्रुवारीला ८.३० तास ईडी चौकशी झाली होती. तर आज रोहित पवार ईडी चौकशीला न जाता कागदपत्र ईडीकडे सादर करणार आहेत. विशेष बाब म्हणजे रोहित पवार यांच्याकडून ईडीला समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांना पुन्हा एकदा ईडी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. २४ जानेवारीला रोहित पवार यांना ईडी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते तेव्हा शरद पवार स्वतः दिवसभर पक्ष कार्यलयात बसून होते. त्यानंतर दुसऱ्या चौकशीच्या वेळी रोहित पवार यांच्यासोबत शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार दिवसभर पक्ष कार्यालयात बसून होत्या. रोहित पवार यांच्या चौकशीला शरद पवार गटाच्या अनेक नेत्यांनी विरोध केला होता. अनेक ठिकाणी आंदोलन देखील करण्यात आले.

ईडी चौकशी पूर्वी रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली होती. त्यावेळी रोहित पवार म्हणाले, गेल्या काही वर्षांत संविधान बाजूला ठेवण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. २०१४ ते आतापर्यंत संविधानाला तडा आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. दबाव टाकून सर्वच खासदार जर भाजपने स्वतःच्या बाजूने केले, तर भविष्यात निवडणूका होतील की नाही याची शंका आहे. २०२४ मध्ये भाजपची सत्ता आली तर पुढच्या निवडणूका लागतील याबाबत देखील शंका आहे, असे म्हणत रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली होती.

हे ही वाचा: 

‘असा’ असणार २०२४ चा Namo Maharojgar Melava, कसा करायचा अर्ज?

लोकांच्या भल्यासाठी काम करणारे अधिकारी लोकप्रिय असतात – CM Eknath Shinde

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss