Tuesday, April 16, 2024

Latest Posts

रवींद्र वायकर यांना ईडीच्या धमक्या, संजय राऊतांनी केला आरोप

राज्यभरात सगळीकडे ईडीच्या धाडीचे सत्र सुरु आहे.

राज्यभरात सगळीकडे ईडीच्या धाडीचे सत्र सुरु आहे. रोहित पवार , किशोरी पेडणेकर, रवींद्र वायकर यांच्यासह अनेक नेत्यांना ईडीने समन्स बजावला आहे. त्यातच आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळ जनक दावा केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची मागील काही दिवसांपासून ईडी चौकशी सुरु आहे. जोगेश्वरीमधील जमिनीच्या भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीने त्यांच्यावर कारवाई केली आहे. आधी ईडीने त्यांची चौकशी केली. पण आज संजय राऊत यांनी ट्विट करत एक खळबळजनक दावा केला आहे. रवींद्र वायकर यांना ईडीच्या धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

खासदार संजय राऊत ट्विट करत म्हणाले, शिवसेनेतील आमचे सहकारी नेते आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसापासून ED वैगरे तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड दबाव सुरू आहे. येत्या काही दिवसात शिवसेना सोडा. पक्षांतर करा. नाहीतर तुरुंगात जा असे त्यांना धमकावले जात आहे. हा एक प्रकारे दहशतवाद आहे. असे राजकारण या आधी कधीच घडले नव्हते. रवींद्र वायकर हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते कोणत्याही धमक्या आणि दबावाला भीक घालणार नाहीत. ते लढतील आणि जिंकतील. आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत, असे संजय राऊत म्हणाले.

महाविकास आघाडी आणि भाजपचे नेते यांच्यामध्ये नेहमीच ईडी चौकशीवरून आरोप प्रत्यारोप सुरु असतात. पण काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या नेत्यांना ईडी चौकशीला सामोरे जावे लागत आहे. रवींद्र वायकर यांनासुद्धा काही दिवसांआधी ईडीची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर त्यांची ईडी चौकशी करण्यात आली. तसेच ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना कथित कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांना कथित खिडची घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली होती.

हे ही वाचा: 

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग | Devendra Fadnavis | Pankaja Munde

भिजवलेले अंजीर खाल्ल्याने शरीराला होतात आरोग्यदायी फायदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss