Saturday, May 18, 2024

Latest Posts

एकनाथ खडसे यांनी केली गिरीश महाजनांवर खोचक टीका

जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे अनेकदा आमने सामने येताना दिसत असतात. त्यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक होताना आपण बघत असतो.

जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे अनेकदा आमने सामने येताना दिसत असतात. त्यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक होताना आपण बघत असतो. त्यामध्येच आता मंगळवारी पार पडलेल्या जळगाव बाजार समितीच्या निवडणुकी संदर्भात भाजप आणि शिवसेना शिंदे बैठक पार पडली. यावेळी भाजपचे गिरीश महाजन देखील यावेळी उपस्थित होते. बैठक पार पडताच गिरीश महाजन यांनी काही संकेत माध्यमांसमोर मांडले. जळगाव जिल्हा दूध संघाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी दूध संघाच्या माजी अध्यक्षा मंदा खडसे यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल होणार असल्याचे संकेत मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांना दिले. यावेळी एकनाथ खडसे यांनी कडक शब्दात त्यांना प्रतिउत्तर देखील दिले. प्रतिउत्तरात गिरीश महाजनांना सगळीकडे आणि राजकारणात फक्त मीच दिसतो असे एकनाथ खडसे म्हणाले.

हाती आलेल्या माहिती नुसार जळगाव जिल्हा दूध संघाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी दूध संघाच्या माजी सदस्यांनी अद्यापही पैसे न भरल्यामुळे नाईलाजास्तव येत्या दोन ते तीन दिवसांत गुन्हा दाखल होणार असल्याचं म्हणत गिरीश महाजन यांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ खडसे यांना लक्ष्य करताना बघायला मिळतंय. या दरम्यान, एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांवर खोचक शब्दांत “गिरीश महाजन यांना माझ्या नावाची कावीळ झाली आहे. त्यांना तिन्ही त्री काळ उठता-बसता फक्त एकनाथ खडसेच दिसतात अशी थेट एकनाथ खडसे यांनी केली आहे. खडसे म्हणाले, जळगाव जिल्हा दूध संघामध्ये जो काही गैरव्यवहार झाला असेल, तर त्याची तक्रार मी स्वत: केली आहे.

मात्र, राजकीय दबावामुळे माझ्या तक्रारीची दखल अद्यापही कोणाही कडून दाखल घेण्यात आलेली नाही. माझ्या तक्रारीवरून जर गुन्हा दाखल झाला, तर आर्थिक गैरव्यवहार नेमका कोणी केला, हे स्पष्ट होईल”, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. एकनाथ खडसे असे देखील म्हणाले या प्रकरणी कोणताही गैरव्हवहार झाला नसून काही अंशी थोड्या फार प्रमाणात अनियमितता असू शकते आणि ज्यांनी ह्या प्रकरणी अनियमितता दाखवली असेल त्यांना समोर घेऊन शिक्षा करण्यात यावी असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले परंतु उगाच कोणत्या तरी प्रकरणात हात घालून त्याचा बाऊ करायचा आणि सत्तेच्या जोरावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

हे ही वाचा : 

Girish Bapat यांची प्रकुती खालावली, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचाराला सुरुवात

बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयींना जे जमले नाही ते आम्ही करून दाखवले, तानाजी सावंत

Ram Navami 2023, साईबाबा संस्‍थानच्या वतीने ३ दिवसीय रामनवमी उत्सव सुर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss