Saturday, May 4, 2024

Latest Posts

Eknath Shinde यांचा मोठा गौप्यस्फोट; Uddhav Thackeray, Aaditya Thackeray यांच्याबाबत केला खळबळजनक दावा

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून चर्चांना सुरुवात झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठा गौप्य्स्फोट करत महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सरकारने भाजपच्या बड्या नेत्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवून जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता, असे म्हणले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून चर्चांना सुरुवात झाली आहे. ‘देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकर यांना खोट्या केसेस मध्ये अडकावून अटक करण्याचे षडयंत्र रचले होते,’ असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

या मुलाखातीदरम्यान एकनाथ शिंदे म्हणाले, “महाविकास आघाडी सरकार मध्ये मला खूप अपमानास्पद वागणूक मिळाली. आदित्य ठाकरे माझ्या खात्यात खूप हस्तक्षेप करत होते. राज्यसभा उमेदवार निवडीत मला बाजूला ठेवण्यात आले. मविआ सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनी (Uddhaav Thackeray) मला कायमच डावलले आहे. माझ्याकडे नगरविकास खाते असताना मला कधीच स्वतंत्रपणे काम करू दिले नाही. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) कायम कामात ढवळाढवळ करत होते. नगरविकास, एमएमआरडीए, सिडको आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या बैठकांना ते उपस्थित असायचे. मला नक्षलवाद्यांकडून धमकी आली असतानादेखील मला Z+ सुरक्षा दिली नव्हती.”

पुढे ते म्हणाले, “मी सुरतला जात असताना वसईमध्ये एका चहाच्या टपरीवरून उद्धव ठाकरेंना फोन केला होता. त्यावेळी मला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. पण वेळ निघून गेलीय, असे मी म्हणालो. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतल्या भाजप नेत्यांना फोन करून आपण पुन्हा एकत्र येऊ, एकनाथ शिंदेसोबत का जातंय असे म्हंटले, पण तोपर्यंत पाणी पुलाखालून वाहून गेले होते.”

पुढे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत एकनाथ शिंदे म्हणाले,”जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन होत होते. तेव्हा मला मुख्यमंत्री केले जाईल या अपेक्षेने मला आणखी पोलीस बंदोबस्त मिळाला होता. परंतु नंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी मला सांगितले, ठाकरेंकडून आलेल्या लोकांनी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यांनीच शरद पवार यांना उद्धव ठाकरेंच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्याची विनंती केली होती. उद्धव ठाकरेंचे स्वप्न मुख्यमंत्री बनण्याचं होते. महाविकास आघाडीची स्थापना हा पूर्वनियोजित कट होता. वडिलांसारखे किंगमेकर होण्याऐवर्जी उद्धव यांना स्वतः राजा व्हायचे होते. आदित्यच्या मुख्यमंत्री होण्याच्या मार्गात मी अडथळा ठरेन, असे त्यांना वाटत होते. पण त्यांना आदित्यला मुख्यमंत्री बनवण्याची घाई होती.”

हे ही वाचा:

वाघाचे कातडे पांघरणाऱ्या शेळ्या कधीच वाघ होणार नाहीत, Eknath Shinde यांचा Uddhav Thackeray यांच्यावर घणाघात

Mahayuti मध्ये Nashik Loksabha Constituency चा तिढा कायम; Shivsena, NCP नंतर आता BJP ही मैदानात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss