spot_img
Sunday, December 15, 2024
spot_img

Latest Posts

एकनाथ शिंदे हे फेकूचंद,फेकूचंदवर कोण विश्वास ठेवणार? हे गुंडांचे सरदार; संजय राऊतांची शिंदेंवर टीका

मुंबईमध्ये दोन दिवसांपूर्वी मुंबई महागरपालिकेचे माजी आमदार अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली होती.

मुंबईमध्ये दोन दिवसांपूर्वी मुंबई महागरपालिकेचे माजी आमदार अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणावरून शिंदे आणि ठाकरे गटामध्ये अनेक आरोप प्रत्यारोपना सुरुवात झाली. त्यावेळीएकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवण्यात आली होती. ‘करमचंद जासूस’ अशी खिल्ली उडवण्यात आली होती. त्यांच्या या खिल्लीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. जासूस करमचंद याने चांगली कामं केली होती. पण हा इतिहास माहिती असायला अभ्यास आणि थोडं वाचन असणे आवश्यक आहे. मात्र, एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे गुंडांसोबत वावरत असतात, असे संजय राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरेंना ‘करमचंद जासूस’ म्हणणारे एकनाथ शिंदे हे फेकूचंद आहेत. या फेकूचंदवर कोण विश्वास ठेवणार? हे गुंडांचे सरदार चोरांची टोळी चालवतात. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना जासूस करमचंद म्हणताना माहिती घेऊन बोलावे. पण त्यासाठी अभ्यास आणि थोडं वाचन असावे लागते. आसपास गुंड नव्हे तर विचारवंत, बुद्धिवंत असावे लागतात. रोज चार गुंडांसोबत बैठका घेऊन बुद्धीचे दरवाजे उघडत नाहीत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची परंपरा आहे की, ते लेखक, साहित्यिक, कवी, विचारवंत, कवी, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्त्यांना भेटतात. पण आजचे मुख्यमंत्री हे खंडणीखोर, चोर, बलात्कारी, अपहरणकर्ते, खुनी लोकांना भेटतात. त्यामुळे फेकूचंद मुख्यमंत्र्यांना त्यांच्या आसपासचे लोक ‘जासूस करमचंद’ वाटतात. एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्यासारख्या सभ्य लोकांची भीती वाटते. उद्धव ठाकरे हे जागतिक दर्जाचे छायाचित्रकार आहेत. एकनाथ शिंदे यांना जाऊन विचारा की, तुमचे नाव कशात आहे, तुमच्याकडे कोणता गुण आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे.

पुण्यामध्ये ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमाच्यावेळी पत्रकार निखिल वागळे, असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला होता. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर दगड आणि विटांचा मारा केला. मात्र, याप्रकरणात पुणे पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. पुण्याचे पोलीस आयुक्त गुन्हेगारांची ओळख परेड काढण्याची नौटंकी काढतात. पण निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर कारवाई करत नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

हे ही वाचा: 

सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा

सई ताम्हणकरच्या ‘भक्षक’ वेब सिरीजची सगळीकडे होतेय चर्चा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss