Tuesday, April 16, 2024

Latest Posts

सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा आंतरवली सराटीमध्ये काल सकाळपासून उपोषणासाठी बसले आहेत.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा आंतरवली सराटीमध्ये काल सकाळपासून उपोषणासाठी बसले आहेत. सरकारने काढलेल्या सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी जरांगे पुन्हा एकदा उपोषण करत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा आंतरवली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरु केले आहे. जोपर्यंत सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. आंतरवली सराटीमध्ये हे त्यांचे चौथे उपोषण असणार आहे. तसेच आत्तापर्यंतच हे सगळ्यात कठोर उपोषण असणार आहे, असे देखील मनोज जरांगे म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे लाखो मराठा बांधवाना घेऊन मुंबईमध्ये आले होते. त्यानंतर आंदोलन मुंबईच्या वेशीला पोहचल्यानंतर सरकारने मराठा आरक्षणाबाबत सगेसोयरेचा अध्यादेश काढला. सरकार काढून काढण्यात आलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी पंधरा दिवसांच्या आतमध्ये होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र ९ फेब्रुवारीला सरकारने दिलेली मुदत संपली होती. त्यामुळे मनोज जरांगे आता चौथ्यांदा आंदोलनासाठी बसले आहेत. सगेसोयरे अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी यासाठी मनोज जरांगे अंदोलन करत आहेत. या आंदोलनादरम्यान मनोज जरांगे ना पाणी पिणार आहोत, ना कोणते उपचार घेणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. तर अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी जरांगे यांची भेट घेऊन उपचार घेण्याची विनंती करत आहेत. जिल्हा प्रशासनाची विनंती मनोज जरांगे यांनी धुडकावून लावली आहे.

शनिवारपासून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. यावेळी त्यांनी पुन्हाएकदा सरकारवर निशाणा साधला आहे. ठरल्याप्रमाणे सरकारने ९ फेब्रुवारी पर्यंतची मुदत दिली होती. त्यामुळे आता सरकारने तात्काळ या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी. आंतरवाली सराटीसह राज्यभरात मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा शब्द सरकारने दिला होता. मात्र अजूनही हे गुन्हे मागे घेण्यात आले नाही. राज्यभरात सापडत असलेल्या मराठा कुणबी नोंदी ग्रामपंचायत वर लावण्याचा शब्द सरकारने दिला होता. याची कुठेही अमंलबजावणी होत नसल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.

हे ही वाचा: 

मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी; प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

मनोज जरांगेंनी सरकारला वेळ दिला पाहिजे, आरक्षणाच्या मुद्द्यावरून बबनराव तायवाडे यांनी दिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss