Thursday, February 29, 2024

Latest Posts

सगळे करप्ट पार्टीत आहेत मग नवाब मालिकांवरच हल्ला का?, संजय राऊत

सध्या नागपूरला लबाड लांडगं ढोंग करतंय बाकी सर्व सोंग करतंय, असं सुरू आहे. ढोंग आणि सोंग सुरू आहे. नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत.

भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यासंदर्भात गुरुवारी एक लेटरबॉम्ब टाकला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रात नवाब मलिक यांना महायुतीत सहभागी करुन घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. या मुद्द्यावरून सध्या राजकारणात अनेक घडामोडी या होत आहेत. अशातच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया ही दिली आहे.

यावेळी माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले आहेत की, सध्या नागपूरला लबाड लांडगं ढोंग करतंय बाकी सर्व सोंग करतंय, असं सुरू आहे. ढोंग आणि सोंग सुरू आहे. नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. मंत्रीही होतेच. त्यांच्यावर जे आरोप आहेत ते सिद्ध व्हायचे आहेत. मलिक यांच्या संदर्भात अजित पवार आणि जयंत पाटील यांनी त्यावेळी भूमिका घेतली होती. आरोप सिद्ध झाले नाहीत, त्यांना आरोपी ठरवता येत नाही. तेव्हा विधानसभेत आणि विधानसभेच्या बाहेर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी यांनी भाषणं केली होती. भाजपच्या पाळलेल्या टोळ्यांनी त्यावेळी मलिकांविषयी विधान केलं ते पाहण्यासारखं आहे, असंही ते म्हणाले.

तसेच राऊत पुढे म्हणाले आहेत की, नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांच्यावर आरोप सिद्ध व्हायचे आहेत. भाजपच्या ज्या टोळ्या आहेत त्यांनी जे काही वक्तव्य केले आहे ते पाहण्या जोगे आहे. मलिक काल अजित पवार गटाच्या बाकावर बसले त्यामुळे भाजपाच्या नैतिकतेचे बुडबुडे फुटू लागले आहेत. तुम्हाला नैतिकतेचा पुळका आहे काय तर म्हणे सत्तेपेक्षा देश महत्वाचा सत्ता येते आणि जाते. नवाब मलिक यांच्यावर हल्ला करता त्याचप्रकारची केस आणि खटला प्रफुल पटेल यांच्यवर पण आहे त्यांच्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे. मुश्रीफ ७० हजार घोटाळेवाले, सिंचन घोटाळेवाले अजित पवार, ईडीच्या कारवाई असणारे सरनाईक आणि गवळी. सगळे करप्ट पार्टीत आहेत मग नवाब मालिकांवरच हल्ला का? असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच पुढे संजय राऊत पुढे म्हणाले आहेत की, तानाजी सावंत हे अत्यंत खोटारडे मंत्री आहेत.राहुल गटे नावाच्या अधिकाऱ्याने नवी मुंबईतील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या पैशे गोळा करण्यासाठी ते तानाजी सावंत यांना माहित नाही का ?

हे ही वाचा:

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस गाजण्याची शक्यता

पुणेकरांनी मेट्रोकडे पाठ फिरवली, चार महिन्यात एवढ्या प्रमाणात उत्पादन घटले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss