Monday, May 20, 2024

Latest Posts

सुप्रीम कोर्टानं सरकारला नपुंसक म्हणणं हे कितपत योग्य आहे, हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? – अजित पवार

महाराष्ट्रामध्ये सकाळ हिंदू समाज या संघटनेने काढलेल्या रॅलीमध्ये विद्वेषी वक्तव्ये करणाऱ्यांविरोधात न केल्याबद्दल यंत्रणा आणि अधिकाऱ्यांविरोधामध्ये अपमानाची कारवाई कारवी अशी याचिका न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे.

महाराष्ट्रामध्ये सकाळ हिंदू समाज या संघटनेने काढलेल्या रॅलीमध्ये विद्वेषी वक्तव्ये करणाऱ्यांविरोधात न केल्याबद्दल यंत्रणा आणि अधिकाऱ्यांविरोधामध्ये अपमानाची कारवाई कारवी अशी याचिका न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे. राजकीय नेत्यांनी धर्माचा राजकारणासाठी वापर करण्याचे टाळले तर विद्वेषी वक्तव्येही बंद होतील, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश के. एम. जोसेफ (K. M. Joseph) आणि न्या. बी. व्ही. नागरत्ना यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. विद्वेषी वक्तव्ये हे एक प्रकारचे दुष्टचक्र असून त्यापासून लोकांनी दूर राहिले पाहिजे असे खंडपीठाने सांगितले आहे. यावर आता अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्य सरकारला एक प्रश्न विचारला आहे.

अजित पवार म्हणाले की, विद्वेषी वक्तव्ये रोखण्याची जबाबदारी राज्यांचीच आहे कारवाईचा बडगा उगारण्यात यंत्रणा अपयशी ठरत आहे. सरकार हे शक्तिहीन झाले आहे. सरकार वेळेवर कोणावरही कारवाई करत नाही जर हे असेच सुरु राहिले तर या सरकारची गरजच नाही. राजजीय नेत्यांनी धर्माचा राजकारणासाठी वापर करण्याचे टाळले तर विद्वेषी वक्तव्येही बंद होतील. सर्वाच्च न्यायालयाने राज्यातील शिंदे- फडणवीसवर तीव्र शब्दांमध्ये निशाणा साधला आहे यावरून आता प्रतिक्रिया उमटायला लागलं आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अजित पवार यांनी शिंदे सरकारवर निशाण साधला आहे. सर्वाच्च न्यायालयाने मत नोंदवल्यावर सगळ्यांनी त्या गोष्टीचा आदर करून सरकारने आत्मचिंतन केलं पाहिजे. १९६० पासून आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होई पर्यंत सर्वाच्च न्यायालयाने महाराष्ट्रातल्या कोणत्या सरकारला नपुंसक म्हटल्याचं ऐकले आहे का? जर सर्वाच्च न्यायव्यवस्थाच असे म्हणायला लागली तर खरेच सरकारने ही बाब गांभीर्याने घायला हवी. तुषार मेहता याना न्यायालयाने ऐकवले त्यांच्या संपर्क साधून नेमके काय झाले पुढे कर कारवाई केली जाईल यावर निर्णय घायला हवा असे अजित पवार म्हंटले आहेत.

सर्वाच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सरकारला नपुंसक म्हंटले आहे हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? हा सरकारचा कमीपणा नाही? आम्ही अधिवेशनामध्ये ४ आठवडे तेच अंगात होतो की आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वाच्च न्यायालयामध्ये आहे त्यावर अजून निकाल लागलेला नाही. त्या मुद्द्यावर बोलले तर सरकारमधल्या प्रमुखांना वाईट वाटते. आता आपले युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला आणि इथल्या सरकारला सर्वोच्च न्यायालय नपुंसक म्हणत आहे. कारभार कशाप्रकारे चालतोय कुणास ठाऊक. आता दोष कुणाला द्यायचे, त्याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे, या शब्दांमध्ये अजित पवार यांनी हल्लाबोल केला.

हे ही वाचा : 

मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप, वैभव कदम याची हत्या

प्रियंका चोप्राची चुलत बहीण मीरा चोप्राने बॉलीवूडवरील टिप्पणीवर प्रतिक्रिया दिली

जितेंद्र आव्हाडा यांच्या तत्कालीन बॉडीगार्डची आत्महत्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss