Monday, May 20, 2024

Latest Posts

कपिल देवचं तिथे आगमन झालं असतं तर राजकीय नेत्यांच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं, संजय राऊत

गुजरातमधील (Gujarat) अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) वर्ल्डकप २०२३ (World Cup 2023) चा महामुकाबला पार पडला.

गुजरातमधील (Gujarat) अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) वर्ल्डकप २०२३ (World Cup 2023) चा महामुकाबला पार पडला. या सामन्यात टीम इंडियासह (Team India) देशातील १४० कोटी भारतीयांचं स्वप्न भंगलं. पण वर्ल्डकपच्या महाअंतिम सामन्यासाठी देशाला पहिला वर्ल्डकप जिंकून देणारे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांना आमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. यावरुन सोशल मीडियातही जोरदार चर्चा सुरू आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही यावर भाष्य केलं आहे.

यावेळी माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले आहेत की, भारतीय संघ हरला ते दुःख सर्वांना झाले आहे .या देशांमध्ये खेळाडू वृत्ती आहे आणि खेळांमध्ये हारजित होत असते. नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा पराभव झाला आहे. अंतिम सामने दिल्लीत होतात किंवा मुंबई वानखेडे मैदानात होतात. मात्र या वेळेला क्रिकेटमध्ये राजकीय लॉबी घुसली आहे एका राज्याची त्यांनी वल्लभाई पटेल स्टेडियम चे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम ठेवले आहे. सामना या ठिकाणी ठेवला यामागे भारतीय पक्ष सर्व आपल्याकडे श्रय घेण्याचा विचार होता. हा सामना म्हणजे भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया नसून भाजप विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना होता. जिंकला तर भारतीय जनता पक्ष, आता हरलात ना? असं राऊत म्हणाले आहेत.

तसेच संजय राऊत पुढे म्हणाले आहेत की, भारतीय संघ उत्तम खेळला हरले असले तरी त्यांचा अभिनंदन केलं पाहिजे व दुःखात आपण देखील सामील झाले पाहिजे. मी संघावर व्यक्तिगत टीका टीपनी करणार नाही. वर्ल्ड कप जिंकला असता तर देशाला आनंद झाला असता . मात्र ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाकडून राजकारण निकालानंतरची व्यवस्था करण्यात आली होती दुर्दैवाने पाणी त्याच्यावरती फिरले. सर्वप्रथम देशाला विश्वचषक मिळून दिला कपिल देव आणि त्याच्या संघाला आमंत्रित केलं नाही. कपिल देवचं तिथे आगमन झालं असतं तर राजकीय नेत्यांच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं याला राजकारण म्हणतात. पडद्या मागचे राजकारण काल झालं भविष्यात त्याचं नक्कीच चर्चा होणार. क्रिकेटची पंढरी मुंबई मुंबईतून सर्वच उद्योग घेऊन जायचं पैसा घेऊन जायचं कॉर्पोरेट कंपन्या घेऊन जायचे आणि क्रिकेट देखील घेऊन जायचं आहे असं देखील राऊत म्हणाले आहेत.

तसेच राऊत पुढे म्हणाले आहेत की, सुरुवात कोणी केली त्यांच्यावर नोटीस कारवाई का केली नाही ? मुंब्रा शाखेवर ज्यांनी बुलडोजर चढवला त्यांच्यावर कारवाई का केली गेली नाही ? शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळी गद्दार आणि बेमान लोकांनी पाय ठेवू नये. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की गद्दारांना तुडवा म्हणून आपण स्वतःला शिवसैनिक समजतात मग आमच्या लोकांनी तुडवण्याचा प्रयत्न केला असेल तर कशाला गुन्हे दाखल करता? शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचाराने व शिवसैनिक संयमी पणे वागले. नोटिसांना कोण विचारतो पाठवा नोटिसा २०२४ पर्यंत तुम्हाला जेवढा कागद वाया घालवायचा तेवाढ घालवा.

हे ही वाचा:

IND vs WI 4th T-20 – टीम इंडियासमोर मालिका जिंकण्याचे आव्हान

प्रत्येक पुरुषांनीही हा चित्रपट पाहायला हवा, राज ठाकरे, १०० रुपये तिकीट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss