राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आज मुंबईमध्ये राज्य विधिमंडळाचे (Maharashtra Assembly) विशेष अधिवेशन (Special Assembly Session) बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत केलेल्या मागण्यांवर चर्चा केली जाणार आहे. मंत्रिमंडळात मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला मंजुरी दिली जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रस्ताव मांडणार आहेत. काढण्यात आलेल्या प्रस्तावावर सर्वपक्षीय चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देणार आहेत.
सरकारने अधिवेशनात काढलेल्या सगेसोयरेंच्या कुणबी नोंदी संदर्भातील अधिसूचनेचा मुद्दा येण्याची कमी शक्यता आहे. याबाबत सामाजिक न्याय विभागाकडे तब्बल साडेचार लाख हरकती देण्यात आल्या आहेत. या हरकतींवर सामाजिक न्याय विभागाकडून सध्या अभ्यास सुरु आहे. तसेच याबाबतचा अहवाल सरकार लवकरच सादर करणार आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात सगळीकडे चर्चेत असल्याने आज राज्य विधिमंडळाकडून विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचे विधेयक मांडले जाणार आहे. विधेयक मांडल्यानंतर दोन्ही सभागृहांत चर्चा केल्यानंतर हे विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनाची सुरुवात सकाळी ११ वाजता राज्यपालांच्या भाषणाने होणार आहे. विधेयकामध्ये मराठा समाजाला नोकरीत १२ आणि शिक्षणात १३ टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी तरतूद विधयेकामध्ये करण्यात आली आहे. मागासवर्ग आयोगाने सादर केलेला अहवाल विधानसभेत मांडला जाणार आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. राज्यभरात या आयोगाने सर्वेक्षण केले आहे. त्यानंतर हा अवहाल दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात आला होता. याचं अहवालानुसार मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार आहे.
मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषण करत आहेत. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे आरक्षणाच्या मागणीसाठी लाखो आंदोलकांना घेऊन मुंबईच्या वेशीवर आले होते. त्यानंतर सरकारकडून त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. मात्र देण्यात आलेल्या अधिसूचनांची अंमलबजावणी न झाल्याने जरांगे पुन्हा एकदा उपोषणासाठी बसले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीचा इतिहास मागील ४० वर्षांपासून आहे. या संघर्षामध्ये अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे.
हे ही वाचा:
पाचगणीमध्ये बिलीमोरया शाळेच्या पटांगणावर पार पडला पॅराग्लायडिंग स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा
स्ट्रॉबेरी पिकाला अनुदान देण्यासाठी शासन प्रयत्नशील – CM EKNATH SHINDE
Follow Us