Tuesday, April 16, 2024

Latest Posts

महाराष्ट्राचे चरित्र सांभाळता येत नसेल तर सत्ताधाऱ्यांनी राजीनामे द्यावे; आमदार यशोमती ठाकूर यांची टीका

मुंबई महानगरपालिकेचे ठाकरे गटाचे माजी आमदार अभिषेक घोसाळकर यांची काल रात्री हत्या करण्यात आली.

मुंबई महानगरपालिकेचे ठाकरे गटाचे माजी आमदार अभिषेक घोसाळकर यांची काल रात्री हत्या करण्यात आली. अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाईव्ह चालू असताना मॉरिस नोरोन्हा याने गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्याच्या राजकारणांत अनेक चर्चाना उधाण आले आहे. अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या घटनेवर बोलताना आमदार यशोमती ठाकूर म्हणल्या, महाराष्ट्र राज्य पुरोगामी म्हणून ओळखले जाते. बिहारचा महाराष्ट्र करणाऱ्यांना महाराष्ट्राला माफ करणार नाही. महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आणि महाराष्ट्राचे चरित्र सांभाळता येत नसेल तर सत्ताधाऱ्यांनी, मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तत्काळ आपले राजीनामे दिले पाहिजेत, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

या गोळीबार प्रकरणी लोकप्रतिनिधी द्वारे किंवा लोकप्रतिनिधी वर असे गोळीबार होत असतील तर याचा अर्थ असा आहे की पोलिसांची भीतीच राहिलेली नाही. आज नागपूर मध्ये क्राइम काय लेव्हलवर वाढत आहे. हेच जर पुण्याकडे बघितले तर कोयता गँगची भीती दिवसेंदिवस वाढत आहे. सदा सरवणकरांचे प्रकरण बघितलं तर तेही एक प्रकरण राज्यात फेमस झाले आहे. म्हणजे कोणीही, काही करेल, कोणाला कुणाची भीती उरलेले नाही.असे चित्र सध्या राज्यात दिसत आहे, असे आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या. हे सर्व गोळीबार करणारे लोक म्हणतात, त्यांचे बॉसच आहेत, जे सागर आणि वर्षाबंगल्यावर राहतात. आमचे कोणी काही दुखवू शकत नाही. महाराष्ट्राचा बिहार करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. या लोकांना जर महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आणि महाराष्ट्राचा चरित्र सांभाळता येत नसेल तर नैतिकतेच्या आधारे यांनी खरेच राजीनामे दिले पाहिजे. अशी आमची आग्रही मागणी आहे. प्रकरणाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि सत्ताधाऱ्यांनी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी बिलकुल राजीनामे दिले पाहिजेत, असे आमदार यशोमती ठाकूर म्हणल्या.

काही दिवसांपासून संजय राऊत रोज एक नवा फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये आपण सर्व काही बघू शकतो. किंबहुना हाच खरा पुरावा आहे. लोक जेव्हा विरोधी पक्षात असतात, त्यावेळी कशा पद्धतीने आरडाओरड करतात. यांना जर महाराष्ट्र सांभाळता येत नसेल तर सोडा ना, तुम्ही अशा प्रकारचे डाग महाराष्ट्राच्या चरित्राला लावत असाल तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही, हे याद राखा, असे म्हणत यशोमती ठाकूर यांनी सत्ताधारी पक्षांवर टीका केली आहे.

हे ही वाचा: 

मंडल आयोगाला चॅलेंज करतो काय होईल ते बघूच मग; मनोज जरांगेंचा थेट इशारा

घोसाळकरांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम केले जात आहे; उदय सामंतांनी केला आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss