Saturday, July 27, 2024

Latest Posts

मंडल आयोगाला चॅलेंज करतो काय होईल ते बघूच मग; मनोज जरांगेंचा थेट इशारा

मराठा आंदोलक मनोज जरांगे नाशिक दौऱ्यावर आहेत.

मराठा आंदोलक मनोज जरांगे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी नाशिक दौऱ्यावेळी साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या आद्यपीठ सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले आहे. नाशिकमध्ये मनोज जरांगे यांचे मोठ्या जलौषात स्वागत करण्यात आले. त्यांनी दिंडोरी, कळवण, बागलाण, मालेगाव, नांदगाव तालुक्याचा दौरा केला. त्यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, मराठ्यांची नियत खराब नाही म्हणून आत्तापर्यंत चॅलेंज झाले आहे. मला गोरगरिबांचे वाटोळे करायचे नाही. ७५ वर्षांनंतर आता सग्यासोयऱ्यांसाठी मोठा कायदा बनला आहे.याच्यात जर काही याचिका दाखल झाल्या तर मंडल आयोगालाच चॅलेंज करतो काय होईल ते बघूच मग, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

दरम्यान, बोलताना मनोज जरांगे म्हणाले, एकदा मंत्री आलेला डबल आपल्याकडे येत नाही. ते म्हणतात आम्ही परत त्यांच्याकडे जात नाही. प्रत्येक वेळी खांदा बदलून येतात. मला हिंदी कळत नाही. शेतकऱ्याचा पोरगा आहे पण कार्यक्रमच लावतो. पत्रकार कलाकार असतात. हिंदीत विचारतात मी उत्तरे देतो, पण त्यालाही कळत नाही अन् मी काय उत्तर दिले मलाही कळत नाही. नाशिक जिल्हा पुण्यवान पण ही घाण कुठून आली तुमच्या जिल्ह्यात, असा टोला मनोज जरांगे यांनी भुजबळांना लगावला आहे.

मला म्हणतात मी सासरचे खातो, माझी सासरवाडी लांब. पण हाच सासरवाडीमध्ये खातो. नगरच्या सभेत बघितलं का नुसता लाल झालाय तो. मंडल आयोगाचे नाव घेतलं की घाबरतो. त्याला पक्क माहितेय मंडल आयोग चॅलेंज होतय ते. मंडल कमिशन राज्याने स्वीकारले आहे का? केंद्राने हे फक्त त्यालाच माहिती आहे. न्यायालयाने स्वीकारले का नाही स्वीकारले हे पण त्यालाच माहीत,असा उल्लेख करत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधला आहे. मनोज जरांगे यांच्या नाशिक दौऱ्या दरम्यान एका व्यतीचा मृत्यू झाला आहे. जरांगे यांचे स्वागत करण्यासाठी नांदगावात (Nandgaon) थांबलेल्या एका व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला.

हे ही वाचा: 

राजकीय नेत्यांवर उघडपणे गोळीबार होतोय तिथे…Jitendra Awhad यांचा सवाल

आयुक्तांनी आदेश देऊनसुद्धा सोशल मीडियावर रिल्स पोस्ट, अजित पवारांनी दिला गुन्हेगारांना इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss