Sunday, May 19, 2024

Latest Posts

तेही स्वप्नं बघायला लागले, तर कसं होणार राजकारणाचं? अजित पवारांना शिंदे गटाचा टोला

मागील दोन महिन्यांपासून राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वाच्च न्यायालयामध्ये सुनावणीची जोरदार चर्चा पाहायला मिळाली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे ते अपात्र ठरायला हवेत की नाही? या मुद्द्यांवर ही सुनावणी पार पडली आणि त्यावरचा निर्णय न्यायालयाने रोखून ठेवला आहे.

मागील दोन महिन्यांपासून राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वाच्च न्यायालयामध्ये सुनावणीची जोरदार चर्चा पाहायला मिळाली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे ते अपात्र ठरायला हवेत की नाही? या मुद्द्यांवर ही सुनावणी पार पडली आणि त्यावरचा निर्णय न्यायालयाने रोखून ठेवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये नेमके काय घडणार आहे यावर राजकीय वर्तुळामध्ये तर्क वितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलेल्या एका विधानावरून राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या विधानावरून आज मंत्री आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनी माध्यमांशी बोलताना खोचक टीका केली आहे.

जयंत पाटील यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis government) भवितव्याविषयी सूचक शब्दामध्ये भाष्य केले आहे. जर सर्वाच्च न्यायालयाचा निर्णय शिंदे सरकारच्या विरोधात लागला तर शिंदे सरकार कोसळले आणि राज्यमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल असे प्रकारचं विधान जयंत पाटील यांनी केल आहे. या विधानाला अजित पवार, संजय राऊत यांनीही दुजोरा दिला होता. यावर चर्चा सुरु असतानाच दीपक केसरकरांनी मात्र त्यावरून खोचक शब्दांत टोला लगावला आहे. दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यासंदर्भात बोलताना अजित पवार आणि जयंत पाटील यांची नाव घेत खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मी आजपर्यंत समजत होतो की जे लोक उशिरापर्यंत झोपतात तेच स्वप्न बघतात. त्यांनाही स्वप्न पडायची की महाराष्ट्रामध्ये बदल होईल. जयंत पाटील तर लवकर उठतात. अजित पवार सुद्धा लवकर उठतात. तेही स्वप्न बघायला लागले तर राजकारणाचं कस होईल यांची मला चिंता वाटतेय असे दीपक केसरकर म्हणाले.

पुढे दीपक केसरकर म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावर टीका करणाऱ्या संजय राऊतांवर दीपक केसरकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. दीपक केसरकर म्हणाले की, “संजय राऊत काहीही बोलतात. काल सागाची लाकडं चंद्रपुरातून अयोध्येला गेली. त्यांना कधी हे सुचलंही नसतं की सर्वोत्कृष्ट सागवान हे गडचिरोली आणि चंद्रपूरला तयार होतं. ते श्रीरामाच्या सेवेत गेलं पाहिजे असं त्यांना कधी वाटलं नाही. श्रीरामाच्या नावाने राजकारण करायचं पण हिंदुत्वापासून लांब जायचं असं त्यांचं आहे. काल मालेगावात जाऊन त्यांनी काय केलं, हे सगळ्या जनतेनं पाहिलं आहे. त्यामुळे ते फक्त बोलतात, करत काहीही नाही. त्यांनी हिंदुत्व सोडलंय, बाळासाहेबांचे विचार सोडलेत. त्यामुळे त्यांनीच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला उद्धव ठाकरेंना बांधलंय “असे दीपक केसरकर म्हणाले.

हे ही वाचा : 

मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप, वैभव कदम याची हत्या

प्रियंका चोप्राची चुलत बहीण मीरा चोप्राने बॉलीवूडवरील टिप्पणीवर प्रतिक्रिया दिली

जितेंद्र आव्हाडा यांच्या तत्कालीन बॉडीगार्डची आत्महत्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss