Saturday, July 27, 2024

Latest Posts

तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर तुम्ही स्वतःचा पक्ष स्थापन करा; संजय राऊतांची टीका

निवडणूक आयोगाने काल दिलेल्या निकालानुसार राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना मिळाला आहे.

निवडणूक आयोगाने काल दिलेल्या निकालानुसार राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना मिळाला आहे. तर शरद पवार यांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे. यांवर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, मोदी आणि शहांनी मिळून अजित पवार यांना हा पक्ष दिला आहे ही निवडणूक अयोग्य आणि लोकशाहीची शोकांतिका आहे. निवडणूक अयोग्य हा भारतीय राहिला नसून आज तो मोदी शाहांचा निवडणूक आयोग झाला आहे. अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. महाराष्ट्रा बाबत असे निर्णय घेण्यात आले आहेत. या दोन नेत्यांना महाराष्ट्रावर राग आहे. त्यांना महाराष्ट्रावर सूड घ्याचा आहे. तसेच त्यांना मराठी माणसाचा बदला घ्याचा आहे, हे स्पष्ट दिसत असल्याचे संजय राऊत म्हणाले.

यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष १०० टक्के मराठी अस्मिता जपणारे पक्ष होते. महाराष्ट्रावर अन्याय विरोधात आवाज उठवणारी हे दोन्ही पक्ष होते. आम्ही महाराष्ट्राचा सूड घेतला आहे. पण महाराष्ट्राची जनता हा सूद उलटुन लावल्या शिवाय राहणार नाही. जिथे ठाकरे तिथे शिवसेना आणि जिथे शरद पवार तिथे राष्ट्रवादी हे या महाराष्ट्रातील जनतेचे धोरण आहे, असे संजय राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी पक्षांतर केले त्याबद्दल आमचे काहीही म्हणणे नाही. त्यांनी भाजपमध्ये शिरकाव करून घेतला. पण, त्यांनी शिवसेना पक्षावर दावा सांगावा आणि भाजपने त्यांना तो पक्ष त्यांच्या हातात सोपवावा हा वादाचा मुद्दा आहे. तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर तुम्ही स्वतःचा पक्ष स्थापन करा. त्यानंतर लोकांसमोर जा, होय हा माझा पक्ष असून मला मत द्या म्हणून सांगा. तुम्ही अशा चोऱ्यामाऱ्या, दरोडेखोरी, लफंगीगिरी करून पक्ष चोरून, तुम्हाला राजकारण करायचे असेल तर हे तात्पुरते राजकारण आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना पक्ष मिळाल्याने याचे अभिनंदन भाजपचे लोकं करत आहे. पण लक्षात ठेवा याच पद्धतीने उद्या तुमच्याही हातातील तुमचा पक्ष जाऊ शकतो. आज मोदी शाहांची गॅरंटी ही तात्पुरती गॅरंटी आहे. उद्याचा काळ हा अत्यंत भयंकर आहे. आणि भारतीय जनता पक्षाला याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

हे ही वाचा: 

ज्या बापाने पार्टी सुरु केली तो बापमाणूस आमच्या बरोबर आहे -रोहित पवार

नांदेडमध्ये भगर महाप्रसादातून ६०० पेक्षा जास्त भाविकांना विषबाधा, रुग्णांवर सरकारी रुग्णालयात उपचार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss