Tuesday, April 23, 2024

Latest Posts

नांदेडमध्ये भगर महाप्रसादातून ६०० पेक्षा जास्त भाविकांना विषबाधा, रुग्णांवर सरकारी रुग्णालयात उपचार

नांदेडच्या लोहा तालुक्यातील सावरगाव कोस्टवाडीमध्ये भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

नांदेडच्या लोहा तालुक्यातील सावरगाव कोस्टवाडीमध्ये भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या भंडाऱ्यातील भगर आमटीमुळे सहाशे हुन अधिक नागरिकांना विषबाधा झाली आहे. या विषबाधेमुळे सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रसादामुळे लोहा तालुक्यातील सावरगाव कोस्टवाडीमधील संपूर्ण गावाला विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विषबाधा झालेल्या सर्व नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, रुग्ण संख्या जास्त असल्यामुळे रुग्णानाचे हाल होत आहेत. विषबाधा झालेल्या काही रुग्णांना खाजगी आणि सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना रात्री उशिरा घडल्याने सर्वच रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नांदेडमध्ये संपूर्ण गावकऱ्यांना विषबाधा झाल्याने रात्री उशिरा सर्व रुगणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विषबाधा झालेल्या नागरिकांपैकी ६०० रुग्ण हे सरकारी रुग्णालयात आहेत. तर इतर रुग्णांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांवर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. विषबाधा ग्रस्त नागरिकांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर रुग्णांना जिह्ल्यातील वेगवेगळ्या रुग्णालयातदाखल करण्यात आले आहे. सावरगावमध्ये बाळूमामांची मेंढर आली होती. त्यामुळे रात्री भगर आमटीच्या प्रसादाचा भंडारा ठेवण्यात आला होता. या प्रसादासाठी जवळपास तीन ते चार हजार नागरिक आले होते. रात्री उशिरा प्रसादाच्या जेवणानंतर अनेक भाविकांना उलट्या मळमळीचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर शेकडो विषबाधा ग्रस्त रुग्णांना नांदेडच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. विधबाधा ग्रस्त सर्व रुग्णांवर सरकारी आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नांदेड सोबतच परभणीमध्ये सुद्धा असाच प्रकार घडला आहे. सोन्ना गावामध्ये सुरू असलेल्या सप्ताहामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसादाच्या भगर मधून भाविकांना विषबाधा झाली आहे. विषबाधा झाल्याने शंभर पेक्षा जास्त गावकऱ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णांना उलटी आणि जुलाबाचा त्रास होण्यास सुरुवात झाल्याने अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकादशी असल्याने भगर बनवण्यात आली होती. भगर खाल्ल्यानंतर संध्याकाळी गावातील जवळपास २०० ते २५० लोकांना जुलाब आणि उलटीचा त्रास होण्यास सुरुवात झाली.मोठ्या प्रमाणात रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्याने रुग्णालय प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

हे ही वाचा: 

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवार गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, पवारसाहेब जिथे उभे राहतील तिथे पक्ष उभा राहील

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss